आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. राज यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या फोनबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी सांगितले की, राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यांचा फोन उद्धव ठाकरेंना आला होता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांनी ठाकरेंना फोन केला होता. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. या फोन कॉलमध्ये त्यांनी उद्धव यांना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांना राज भेटले, राऊत म्हणतात...
आज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. ठाकरे गटाकडून या भेटीवर सावध प्रतिक्रिया देण्यात आली. संजय राऊत यांनी या भेटीबाबत म्हटले की, राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अनेकदा भेटले आहेत. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुरू असेल, असे त्यांनी म्हटले.