TRENDING:

CM Devendra Fadnavis On Flood : तातडीने मदतीचे आदेश, उद्यापासून पूरग्रस्त भागाची पाहणी, मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM फडणवीसांनी काय सांगितलं?

Last Updated:

Marathwada Flood : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मराठवाड्यात आलेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाण्याचे आदेश दिले असून आपण स्वत:ही काही ठिकाणी भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तातडीने मदतीचे आदेश, उद्यापासून पूरग्रस्त भागाची पाहणी, मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM फडणवीसांनी काय सांगितलं?
तातडीने मदतीचे आदेश, उद्यापासून पूरग्रस्त भागाची पाहणी, मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM फडणवीसांनी काय सांगितलं?
advertisement

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आतापर्यंत 975 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीनं काहींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक भागांत हेलिकॉप्टरद्वारे NDRF बचावकार्य करत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

advertisement

मंत्री आणि पालकमंत्र्यांनी उद्यापासून पूरग्रस्त भागांची तातडीनं पाहाणी करावी अशी सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सरसरीच्या 105 टक्के पाऊस झाला आहे. तातडीनं शेतकऱ्यांना मदत करणार असून मृत्यूच्या घटनांमध्ये मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर दिले आहेत. तर जनावरं आणि इतर नुकसान जे झालं आहे तेही जिल्हा स्तरावर मदत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

advertisement

त्यांनी पुढे म्हटले की, आजच्या बैठकीत कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती याचा आतापर्यंत संपूर्ण आढावा घेतला. उद्या पालकमंत्र्यांना तातडीनं परिस्थिती पाहाणी करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करण्याची प्रक्रिया आताही सुरू आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली जात आहे. जेवढ्या पद्धतीची मदत करावी लागेल ती केली जात आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील मदत करण्यात येते.

advertisement

केंद्राची मदत मिळणार?

केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी करणार का, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की केंद्राकडून मदत यायला वेळ लागतो. सगळ्या नुकसानीचा अहवाल एकत्रितपणे पाठवला जातो. त्यानंतर मदत मिळते. मात्र, तोपर्यंत आपल्याला NDRF च्या अंतर्गत आपल्याकडे काही निधी आधीच मिळाला असतो. त्या निधीचा वापर करता येईल. केंद्र सरकारकडून मदत निश्चित घेऊ, मात्र त्यासाठी आम्ही थांबणार नाही. आता शेतकऱ्यांना जी मदत लागेल त्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM Devendra Fadnavis On Flood : तातडीने मदतीचे आदेश, उद्यापासून पूरग्रस्त भागाची पाहणी, मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM फडणवीसांनी काय सांगितलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल