मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमध्ये शिळं अन्न दिलं जात असल्याच्या कारणाने संतप्त झालेल्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर विरोधकांनी सरकारला घेरलं.
त्या खात्याच्या मंत्र्याला मारा, कर्मचार्याला का?
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले की, सरकारचा आपल्याच आमदारांवर वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम सुरू आहे. एक आमदार बनियन आणि टॉवेलवर येतो आणि बॉक्सिंग करत असल्यागत एका सध्या माणसाला मारतो. अरे हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा क्लीन आहे आणि तुम्ही अशा आमदारचा पाठिंबा घेणार का? असा सवाल त्यांनी केला. आपल्या विधिमंडळ कक्षात सदर विभाग येतो त्यामुळे तुम्ही त्याला निलंबित करा अशी मागणीदेखील परब यांनी केली.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही. सभागृहातील अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
गायकवाडांना घरचा आहेर, पक्षातूनही विरोध...
आमदार संजय गायकवाड यांच्यात पक्षातील आमदारांनी खडे बोल सोनावलेले आहेत. प्रत्येक विषय हा हाताळण्याची एक वेगळी पद्धत असते जो प्रकार घडला त्याबद्दल तक्रार करता आली असती आणि विषय वेगळ्या पद्धतीने मांडता आला असता तक्रार करून कॅन्टीन आल्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करता आले असतील पण अशा रीतीने मारहाण करण एका आमदाराला शोभत नाही संजय गायकवाड यांनी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे होतं असा घरचा आहेर शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना दिला आहे.