TRENDING:

मशिदीत गेले होते, बाहेर पडताच काँग्रेस नेत्याच्या मानेवर वार, संपूर्ण अंगावर रक्ताचे डाग, अकोल्यात काय घडलं?

Last Updated:

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा हे हिदायत पटेल यांचे मूळ गाव. याच गावात ते गेले असताना मदीन उर्फ कालू पटेल याने त्यांच्यावर हल्ला केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुंदन जाधव, प्रतिनिधी, अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा गावात जीव घेणा हल्ला झाला. त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
हिदायत पटेल (काँग्रेस नेते)
हिदायत पटेल (काँग्रेस नेते)
advertisement

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा हे हिदायत पटेल यांचे मूळ गाव. याच गावात ते गेले असताना मदीन उर्फ कालू पटेल याने आणि त्याच्या समर्थकांनी पटेल यांच्यावर चाकूने वार केले. पटेल मशि‍दीतून बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला.

हिदायत पटेल यांच्या मानेवर वार, गंभीर जखमी

हिदायत पटेल यांच्या मानेवर आरोपीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत सुद्धा हिदायत पटेल यांनी स्वतःला सांभाळले. मला लवकर पाणी द्या, अशी विनंती तेथील स्थानिकांना त्यांनी केली. दवाखान्यात जायला लवकर गाडी आणा, अशी विनंती त्यांच्या नात्यातीलच एकाने स्थानिकांना केली.

advertisement

राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

हिदायत पटेल यांचे गावातील पटेल कुटुंबातील एकाशी गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद सुरू होते. या वादातूनच हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हिदायत पटेल यांना हृदय विकाराचा झटका आला, पुन्हा अकोटमध्येच थांबवलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेल सारखी चिकन तंदुरी, आता सोप्या पद्धतीने बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

पटेल यांना अकोट येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोल्याला हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. मात्र अकोट येथील खासगी रुग्णालयातून अकोला येथे नेण्यास रुग्णवाहिकेत ठेवते वेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने परत त्यांना त्याच खाजगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मशिदीत गेले होते, बाहेर पडताच काँग्रेस नेत्याच्या मानेवर वार, संपूर्ण अंगावर रक्ताचे डाग, अकोल्यात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल