आज मुंबईत महाविकास आघाडीच्या 'महाराष्ट्रनामा' या नावाने निवडणूक जाहीरनामा जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने सांगताना भाजपवर हल्लाबोल केला. खर्गे यांनी म्हटले की, आज आम्ही जाहीरनामा सादर करत आहोत. या आधी आम्ही तुम्हाला पाच गॅरंटी सांगितल्या होत्या. आज आमचा जाहीरनामा सविस्तरपणे जाहीर करत आहोत. जगभराचे लक्ष हे मुंबईकडे असते, देशाचे लक्ष असते. रोजगार, उद्योग, विकास या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असते. हे दलबदलू लोकांसाठीची निवडणुक नाही तर आपण महायुतीला हटविले तरच आपण हे चांगले स्थिर सरकार आणू शकू, असे खर्गे यांनी सांगितले.
advertisement
खर्गे यांनी म्हटले की, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी आमच्या आश्वासनांची खिल्ली उडवण्यात आली. दिवाळखोरीत राज्य काढण्यासाठी या योजना आहेत असे म्हटले गेले. रेवडी वाटप करतोय असे सांगितले गेले, आम्हाला नावं ठेवली गेली आणि आता त्याच भाजपकडून आमची कॉपी केली जात असल्याचेही खर्गे यांनी म्हटले.
आम्ही महिलांना बसप्रवास मोफत देणार आहोत. आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवू जेणेकरून मागास घटकांना न्याय मिळेल असेही खर्गे यांनी सांगितले. आम्ही अडीच लाख नोकऱ्या सुरू करण्यासाठी ताबडतोब काम सुरू करू. राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचा निर्णय आम्ही जाहीर करू, असेही खर्गे यांनी म्हटले.
इतर संबंधित बातमी :
