हवामान विभाग तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात पुढचे 7 दिवस पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तामिळनाडूच्या दिशेनं वादळ येत आहे. तिथे सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरं सायक्लोनिक सर्क्युलेशन आसामच्या जवळ आहे. या दोन्हीमुळे समुद्रातील वारं फिरलं असून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट राहणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतात मुसळधार पाऊस राहणार आहे.
advertisement
मान्सून जाताच उकाडा वाढला आहे. आज आणि उद्या दोन्ही दिवस महाराष्ट्रात पाऊस राहणार नाही. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट राहणार आहे. तामिळनाडूकडून येणारे वारे महाराष्ट्रापर्यंत अवकाळी पावसाचं संकट घेऊन येणार आहे. त्यामुळे 15-16-17 ऑक्टोबर रोजी अवकाळी पाऊस राहणार आहेत. त्यानंतर पुन्हा उकाडा वाढणार आहे. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रावर 15-16 ऑक्टोबर रोजी अवकाळी पावसाचं संकट आहे.
वामान विभागाच्या माहितीनुसार आज संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर बीडमध्ये 34.5 अंश, लातूरमध्ये 35.2 अंश, परभणीमध्ये 34.8 अंश, नांदेडमध्ये 34 अंश, हिंगोलीमध्ये 33.6 अंश, धाराशिवमध्ये 33 अंश आणि जालन्यात 32.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात सरासरी 1 ते 2 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.
हवामान विभाग तज्ज्ञ उमाशंकर दास यांच्या म्हणण्यांनुसार सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. यावेळी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. दिवाळीतही पावसाचा जोर राहणार का ये येत्या 72 तासात समजणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.