ही घटना सायंकाळी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. अचानक पेटलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही मिनिटांतच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
आग लागल्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवासी आणि परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध अद्याप लागलेला नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनमालकांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले आहे. अल्पावधीतच पेट घेतलेल्या आगीमुळे अनेक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
