TRENDING:

मराठ्यांची खाण्याची आबाळ, दक्षिण मुंबईतली दुकाने बंद का ठेवली होती? CM फडणवीसांचे जरांगेंना उत्तर

Last Updated:

Devendra Fadanvis: मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेली सुनावणी, न्यायालयाने सरकारला दिलेले निर्देश, जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा होत नसलेला संवाद, आंदोलकांमुळे मुंबईत उद्भवलेली परिस्थिती आदी विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मते व्यक्त केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीमधूनच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा समाज बांधवांचे आरक्षण आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलकांची खाण्याची प्रचंड आबाळ झाली. आंदोलकांना खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध होऊ नये, यासाठी शासनाने प्रयत्न केले, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांनी केला. त्यांच्या या आरोपांचे खंडन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मनोज जरांगे पाटील-देवेंद्र फडणवीस
मनोज जरांगे पाटील-देवेंद्र फडणवीस
advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहगड रोडवरील फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील २.५ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेली सुनावणी, न्यायालयाने सरकारला दिलेले निर्देश, जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा होत नसलेला संवाद, आंदोलकांमुळे मुंबईत उद्भवलेली परिस्थिती आदी विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मते व्यक्त केली.

advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आरोपांचे खंडन

सरकारनेच मराठ्यांचे खाण्यापिण्याचे हाल व्हावेत म्हणून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवायला लावली, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आंदोलनकर्त्यांनी धुडगूस घातल्यानेच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती, संतापून व्यापारी निघून गेले. त्यानंतर सरकारकडूनच आम्हाला उपाशी ठेवण्याचे प्रयत्न झाले, असे आरोप लावण्यात आले. परंतु आम्ही व्यापाऱ्यांना पोलीस कुमक देतो, दुकाने सुरू ठेवा, असे सांगितल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. आम्ही किंवा कुणीही व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवायला सांगितले नाही, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्‍यांनी आरोप खोडून काढला.

advertisement

आंदोलकांचे वर्तन भूषणावह नाही- मुख्यमंत्री फडणवीस यांची नाराजी

मागील काही वर्षांपूर्वी निघालेल्या मराठा मोर्चाची शिस्त महाराष्ट्र राज्याने आणि देशाने पाहिली आहे. मोर्चाची शिस्त पाहून आणि संवेदनशीलता पाहून सरकारने सकारात्मक पद्धतीने निर्णय घेतले. माझ्या पहिल्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी निर्णय घेतले. परंतु आत्ताच्या आंदोलनामधून आंदोलकांचे वर्तन भूषणावह नाही, अशी नाराजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवली.

advertisement

फडणवीस यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना जशास तसे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील एका व्हिडीओचा संदर्भ देऊन सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणे बंद करा. खरे तर त्यांनी स्वत:ला विचारले पाहिजे की हा प्रश्न का चिघळला? सत्तेत असताना त्यांच्या पक्षाने यावर उत्तर शोधले का? अडीच वर्षांच्या काळात त्यांनी काही निर्णय घेतले का? असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना दिले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठ्यांची खाण्याची आबाळ, दक्षिण मुंबईतली दुकाने बंद का ठेवली होती? CM फडणवीसांचे जरांगेंना उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल