धाराशिव: अयोध्येत राम मंदिर होत असल्याने देशातील अनेक हिंदू बांधवांमध्ये स्वप्न साकार झाल्याची भावना आहे. याच मंदिरासाठी देशात मोठा लढा आणि आंदोलन झाले. अनेक कारसेवकांनी राम मंदिरासाठी संघर्ष केला. 1990 मध्ये कारसेवेसाठी धाराशिव जिल्ह्यातून अनेकजण अयोध्येला गेले होते. यात डोकेवाडीतून 11 कारसेवक निघाले होते. यातील एका शेतकरी कारसेवकाने बैल गहाण ठेवून अयोध्येतील कारसेवा केली.
advertisement
कारसेवकांनी दिला आठवणींना उजाळा
अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत असताना डोकेवाडीतील कारसेवकांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. 1990 मध्ये कारसेवेसाठी डोकेवाडीतून 11 जण अयोध्येला निघाले. 11 पैकी 4 जण मागे राहिले होते तर बाकी पुढे गेले. मागे राहिलेल्यांना अयोध्येत पोहोचण्यापूर्वीच अटक करण्यात आली. यामध्ये 16 वर्षीय ज्ञानदेव वासुदेव पवार, विक्रम गोविंद डोके, अर्जुन सदाशिव आहेर आणि गोरख उत्तरेश्वर खैरे यांचा समावेश होता. त्यांना 21 दिवसांची जेलची हवा खावी लागली आणि त्यानंतर जामीन मिळाला, असे त्यांनी सांगितले.
Ram Mandir फॅशन आणि भक्तीचा अनोखा मिलाफ, अयोध्येतील राम मंदिर आता साडीवर, Video
अयोध्येला जाताना बैल गहाण ठेवला
डोकेवाडीतून कारसेवेसाठी गेलेली ही मंडळी सर्वसामान्य कुटुंबातली होती. त्यातील भगवान दगडू खैरे या शेतकऱ्याकडे अयोध्येला जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःचा बैल एका खाजगी सावकाराकडे 500 रुपयांना गहाण ठेवला आणि अयोध्येला गेले. अयोध्येतून परत आल्यानंतर पैसे परत करून बैल खाजगी सावकाराकडून सोडवला, अशी माहिती भगवान खैरे यांनी दिली.
बाबरी पाडली अन् पोलादी पार घेऊनच आले घरी, कोण आहेत धाराशिवमधील कारसेवक? Video
राम मंदिरासाठी अनेकांचे प्रयत्न
अयोध्येत होत असलेल्या राम मंदिरासाठी देशभरातील अनेक कारसेवकांनी प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असे डोकेवाडीतील कारसेवकांनी सांगितले. तसेच सर्वांनी एकत्र येत हा आनंद साजरा केला.