TRENDING:

पतीच्या निधनानंतर मानली नाही हार, टमटम चालवून हाकतेय संसाराचा गाडा, Video

Last Updated:

पतीच्या निधनानंतर मोहिनी या प्रवासी वाहतूक करणारं टमटम चालवून दोन मुलांचं शिक्षण करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव: भारतात विधवा महिलांचे प्रश्न ही गंभीर समस्या आहे. पतीच्या अकाली निधनानंतर अनेक महिलांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. अनेक महिला या संघर्षाला सामोरं जात जिद्दीनं कुटुंबाचा भार वाहतात. अशीच कहाणी धाराशिवमधील उमरगा येथील मोहिनी चव्हाण यांची आहे. पती विष्णुकांत चव्हाण यांच्या निधनानंतर प्रवासी वाहतूक करणारं टमटम चालवून त्या कुटुंब सांभाळत आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

advertisement

पतीचं निधन अन् कुटुंबाची जबाबदारी

उमरगा येथील विष्णुकांत चव्हाण हे प्रवासी वाहतूक करणारं टमटम चालवायचे. पत्नी मोहिनी यांनाही वाहन चालवण्याचा छंद होता. त्यामुळे त्याही वाहन चालवायला शिकल्या. मात्र, विष्णुपंत यांचं अकाली निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी पत्नी मोहिनी यांच्यावर आली. छंद म्हणून शिकलेली वाहन चालवण्याची कला कामी आली आणि मोहिनी यांनीही परंपरागत प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

advertisement

संघर्षात हार मानेल ती नंदिनी कसली? घरातील कर्ते पुरुष अकाली गेले अन्.., Video

7 वर्षांपासून चालवतायेत टमटम

पतीच्या निधनानंतर मोहिनी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी टमटम चालवण्याचाच मार्ग पत्करला. कोरोना काळात, तसेच एसटीचा संप असतानाही त्यांनी पतीसोबत टमटम चालवले होते. पण कधीकाळी छंद म्हणून वाहन चालवणाऱ्या मोहिनी या आता प्रवासी वाहतूक करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह पाहतात. त्यांना दोन मुले असून ते उमरगा येथील शाळेत शिकत आहेत.

advertisement

उच्चशिक्षित शेतकरी महिलेची कमाल, पुण्यात फुलवला जरबेरीचा मळा, लाखोंची कमाई, Video

दिवसाकाठी 400 ते 600 रुपयांची कमाई

टमटम चालवून खर्च वजा जाता रोज 400 ते 600 रुपयांपर्यंत कमाई होते. या कमाईवरच मुलांचे शिक्षण आणि घर प्रपंच चालतो, असे मोहिनी सांगतात. पतीच्या निधनाचा आघात सहन करूनही मोठ्या धीराने आणि हिमतीने मोहिनी या पुन्हा उभ्या राहिल्या. अनेक अडचणी आल्या तरी न डगमगता त्या डगमगल्या नाहीत. प्रवासी वाहतूक करणारं वाहन चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या मोहिनी यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
पतीच्या निधनानंतर मानली नाही हार, टमटम चालवून हाकतेय संसाराचा गाडा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल