धाराशिव : अनेकदा आयुष्यात असे काही प्रसंग येतात की पारंपरिक व्यवसाय बंद पडतो आणि कुटुंबावर मोठं संकट येतं. पण त्यातूनही न खचता काही जण या कठीण परिस्थितीतून मार्ग काढतात. अशीच काही घटना समोर आली आहे.
परंपरेने आणी पिढ्यानपिढ्या चालत आलेला डोंबारीचा खेळ बंद झाला आणि डोंबारी समाजातील हे कुटुंब उघड्यावर आले. मात्र, जिवंत जगण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात होती. म्हणून आता श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात हेच डोंबारी कुटुंब फुगे विकण्याचं काम करत आहे आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे.
advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अर्जुन फुलचंद जाधव व त्यांचे कुटुंबीय यांचा परंपरेने डोंबारी व्यवसाय होता. डोंबाऱ्याचे खेळ करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या जाधव कुटुंबीयांचा डोंबारी व्यवसाय कालांतराने बंद पडला. त्यामुळे त्यांना मोल मजुरी करण्याची वेळ आली.
wari 2024 : वारकऱ्यांची तहान भागवणारा ट्रक ड्रायव्हर, अनोख्या सेवेतून जिंकलं वारकऱ्यांचं मन!
आता आषाढी वारीच्या कालावधीत जाधव कुटुंबीय श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात फुगे व बलून विकण्याचं काम करतात. सोबत एक चार चाकी वाहन आणि 5-6 जणांचं हे कुटुंबीय श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात जाऊन चांगले आर्थिक उत्पन्न मिळवते.
पांडुरंगाच्या वारीतही योगा, यातून भक्तीचा मार्ग सुखकर…, वारकऱ्यांनी व्यक्त केल्या ‘या’ भावना
सव्वा महिन्याच्या कालावधीत त्यांना खर्च जाऊन 60 हजार रुपयांचे उत्पन्न शिल्लक राहते. व्यवसाय आणि व्यवसायातून वारी वारीतून दर्शन हा त्रिवेणी संगम त्यांनी साधला आहे.