पांडुरंगाच्या वारीतही योगा, यातून भक्तीचा मार्ग सुखकर..., वारकऱ्यांनी व्यक्त केल्या 'या' भावना
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
योग ही एक प्रकारची शरीराला आणि मनाला लावलेली शिस्त आहे. त्याद्वारे साधक शरीर मनांच्या वेगवेगळ्या क्रियाप्रक्रियांवर नियंत्रण करू शकतो. अगदी श्वासोश्वासादि अनैच्छिक प्रतिक्षिप्त क्रियांवर ही त्याचा ताबा राहतो.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : योगाचा नेहमीच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांसाठी उपयोग केला जातो. योग हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मानवजातीसाठी वरदान आहे, असं फार पूर्वीपासून सांगण्यात येतं आहे. सध्या वारकरी हे वारीत सहभागी झाले आहेत. अनेक मैलांचा प्रवास करून विठुरायांच्या चरणी माथा टेकवण्यासाठी त्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. या वाटेवर वारकऱ्यांना योगाअभ्यास देखील शिकवला जात आहे. विशेष म्हणजे वारकरीही त्यात आनंदाने सहभागी होत आहेत.
advertisement
योगाशिक्षक असलेले यशवंत बेलके हे मागील 25 वर्षांपासून वारीत सहभागी होत आहेत. ते वारीमधील वारकऱ्यांना योगा, विविध आसने करायच सांगत आहेत. संथपणे हवा खेळती असलेली जागा, आवाजाचे प्रदूषण नसलेली, माणसांची ये जा नसेल अशाठिकाणी शिवाय योगासने विना अडथळा करण्याइतकी मोठी जागा शोधत ते पांडुरंगाच्या भक्तांना योगाभ्यास शिकवत आहेत.
रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी। देह दंग सावळ्याच्या अंगणी।। पहिलं रिंगण संपन्न
योग ही एक प्रकारची शरीराला आणि मनाला लावलेली शिस्त आहे. त्याद्वारे साधक शरीर मनांच्या वेगवेगळ्या क्रियाप्रक्रियांवर नियंत्रण करू शकतो. अगदी श्वासोश्वासादि अनैच्छिक प्रतिक्षिप्त क्रियांवर ही त्याचा ताबा राहतो. तहानभूक, शीतोष्ण, सुखदुःखादि द्वंद्वे तो सहज सहन करू शकतो. सहन करण्याचे प्रशिक्षण म्हणजेच योग असे म्हटले तरी चालेल त्यामुळे वारीच्या वाटेवर योगाभ्यास महत्वाचा असल्याचं यशवंत बेलके सांगतात.
advertisement
वारीच्या वाटेवरील अनेक महिला पुरुष यांनीदेखील यावेळी विविध आसने केली. त्यामुळे वारीत नवा उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. उत्तम आरोग्य ही आपली धनसंपदा असून पांडुरंगाच्या दारापर्यंत जाण्यासाठी यातून शक्ती मिळत असून भक्तीचा मार्ग अगदी सुखकर वाटू लागत असल्याच्या भावना यावेळी वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 09, 2024 4:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पांडुरंगाच्या वारीतही योगा, यातून भक्तीचा मार्ग सुखकर..., वारकऱ्यांनी व्यक्त केल्या 'या' भावना