धाराशिव: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगामातील पिकांची ई पीक पाहणीची मुदत वाढवण्यात आलीये. पूर्वी ई पीक पाहणीची मुदत 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर अशी होती. मात्र, आता ही मुदत 23 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप आपल्या पिकांची नोंद केली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यायची आहे, असं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
ई पीक पाहणीची नोंद केल्याने थेट आपल्या सातबारा उताऱ्यावर आपल्या शेतातील पिकाची नोंद होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना सरकारी योजनांसाठी होतो. पीक विम्यासह इतर बाबींसाठी ही ई पीक पाहणी महत्त्वाची ठरते. त्यामुळे खरीप हंगामातील ई पीक पाहणीची नोंद सर्व शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे, असे धाराशिवचे कृषी मंडळ अधिकारी निखील रायकर यांनी सांगितलंय.
शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, आता वर्षाला मिळणार 12 हजार, या 5 योजना माहितीये का?
नोंद कशी करावी ?
ई-पीक पाहणीचे अद्ययावत ॲप तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे. त्यानंतर पीक क्षेत्रात जाऊन नाव, गाव, गट क्रमांक नोंदणी करून पिकांची माहिती, अक्षांश, रेखांश यासह पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत. ॲप्लिकेशनच्या नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत 48 तासात केव्हाही एका वेळा दुरुस्ती करू शकतो. यापूर्वी एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवता येत होती. आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य आहे.