पशुपालकांचा रोजगारही निघेना
एक गाय सरासरी दहा लिटरपर्यंत दूध देते. शेतकऱ्यांच्या नफ्याचा विचार करायचा असले तर दहा लिटर दूध उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना येणारा खर्च पाहावा लागतो. एका गाईला दिवसासाठी 50 रुपयांचा हिरवा चारा लागतो. तर वाळला चारा दोन पेंढ्या वैरण देण्यासाठी 100 रुपयांचा खर्च येतो. एका गाईला एका दिवसासाठी 4 किलो पशुखाद्याची गरज पडते आणि हे पशुखाद्य देण्यासाठी 120 रुपयांचा खर्च येतो. एकूणच परिस्थिती पाहिली तर एक गाय एक दिवस जगवण्यासाठी 270 रुपयांपर्यंतचा खर्च येतो. त्यात व्हेटर्नरी डॉक्टरची फी, दिवसभर राबण्याची मेहनत आणि इतर खर्चाचा विचार केल्यास उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याचे चित्र आहे.
advertisement
शेतकऱ्यांनो, ही संधी सोडू नका, अनुदानावर मिळतायेत गाई म्हशी, Video
शेतकरी संकटात
एकूणच परिस्थिती पाहिली तर यावर्षी दुष्काळाची दाहकता असल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे हिरवा चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांना विकत आणावा लागतो. वैरण मिळणं मुश्किल झालंय. पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. ही सर्व परिस्थिती पाहिली तर जनावरे जगवण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणारा खर्च हा दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाइतका होत असल्याचे दुध उत्पादक शेतकरी बाबु खामकर यांनी सांगितले. तसेच दुधाला योग्य दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.