धाराशिव : दिवसाची सुरुवात करताना, आजूबाजूला हिरवीगार वनराई , हिरवागर्द निसर्ग आणि पक्षांचा किलबिलाट अशा परिसरात असलेल्या हुतात्मा स्मारक परिसर आणि या निसर्गरम्य परिसरात असलेल्या या स्मारकाच्या वाचनालयात वाचकांचा मोठा सकारात्मक असा प्रतिसाद मिळतो आहे. धाराशिव जिल्ह्यातील ईट येथील हुतात्मा स्मारक येथील वाचनालयात पुस्तक आणि वार्तापत्र वाचण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
advertisement
ईट या गावाला क्रांतिकारकांचा मोठा वारसा आहे. त्यामुळेच ईट येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. हुतात्मा स्मारकाचा परिसर हा ओसाड होता. येथील हुतात्मा स्मारकाच्या 20 गुंठे जागेत अटल घनवनच्या माध्यमातून 7 हजार औषधी त्याचबरोबर पिंपळ, जांभूळ, भेडा, हिरडा अशा अनेक वृक्षांची सामाजिक वनीकरण, ग्रामस्थ आणि विवेकानंद वाचनालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते.
wari 2024 : वारी का काढली जाते? कोण आहेत वारीचे जनक? असा आहे वारीचा भव्य-दिव्य इतिहास
हुतात्मा स्मारक परिसर वनराईने नटला -
8 महिन्यांची ही झाडे आता 15 फुटापर्यंत वाढले आहेत. त्यामुळे परिसर वनराईने हिरवा गर्द झाला आहे. परिसरात पक्षांचा किलबिलाट वाढला आहे. हुतात्मा स्मारक परिसर वनराईने नटलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निसर्गरम्य परिसरात असलेल्या वाचनालयात दैनंदिन वार्तापत्र व पुस्तके वाचण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी व नागरिक घेत असल्याचे विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी सांगितले.
वारी 2024 : तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, VIDEO
तर 20 गुंठ्यात अटल घनवनच्या माध्यमातून 7 हजार औषधी आणि स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली आहे. हा परिसर वनराईने नटला आहे, अशी माहिती शिवाजी कांबळे वनपरिमंडळ अधिकारी भूम यांनी दिली.