TRENDING:

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा करावा?, संपूर्ण माहिती एका क्लिकवर..

Last Updated:

केंद्र शासनाकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारची ही फळबाग लागवड योजना राबवली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करता येते. ही योजना केंद्र शासनाकडून राबवण्यात येते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव : सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना या राबवल्या जातात. मात्र, अनेकांना या योजनांबाबत माहिती नसते. कुठे अर्ज करावा, काय कागदपत्रे हवीत, प्रक्रिया कशी असते, याबाबत काहीच माहिती नसते, त्यामुळे शेतकरी पात्र असूनही त्याला संबंधित योजनेचा लाभ मिळत नाही. आज अशाच एका योजनेबाबत आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना या योजनेचा कसा फायदा होतो, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.

advertisement

केंद्र शासनाकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारची ही फळबाग लागवड योजना राबवली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करता येते. ही योजना केंद्र शासनाकडून राबवण्यात येते.

फळबाग लागवडीतून शेतीपूरक व्यवसायात वाढ करणे, उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांना शाश्वत रोजगाराची निर्मिती करून देणे आणि फळबाग लागवडी खालील क्षेत्रात वाढ करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

advertisement

भारतीय सैन्यदलासाठी स्पेशल बुलेट प्रूफ जॅकेट तयार, AK-47 ही यापुढे होणार फेल, काय आहे यात असं विशेष?

फळबाग लागवड करताना शेतकऱ्यांना शेतात बांधावर, पडीक जमिनीवर फळझाडांची वृक्षांची किंवा फुल पिकांची आणि मसाला पिकांची आपल्याला योजनेतून लागवड करता येते. या योजनेचा लागवड कालावधी जुन ते डिसेंबर पर्यंत असतो. त्यामुळे योजनेतून कोणत्या फळ पिकांची लागवड करता येते हे जाणून घेऊयात.

advertisement

आंबा, काजू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू ,नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवट, जांभूळ कोकम, फणस, अंजीर, द्राक्ष, केळी, सुपारी, शेवगा, हादगा, कडुलिंब बांबू, कडीपत्ता, औषधी वनस्पती व फळ पिकांची लागवड करता येते. फुल पिकातून गुलाब, मोगरा, निशिगंधा, सोनचाफा या फुल पिकांची लागवड करता येते. तर मसाला पिकातून लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी यांची लागवड करता येते.

advertisement

या योजनेची अंमलबजावणी ही जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत केले जाते.

ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, तर तिकिटाचे हे फायदे जाणून घ्या, महिलांसाठी महत्त्वाची बातमी!

या योजनेसाठीचे निकष -

लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थी हा जॉब कार्डधारक असावा. लाभार्थी हा अल्पभूधारक असावा म्हणजे पाच एकराच्या आत लाभार्थ्याच्या नावावर जमीन असावी. हे निकष पूर्ण केल्यावर तुम्ही कृषी विभागाकडे रीतसर अर्ज करुन योजनेचा लाभ घेऊ शकता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा करावा?, संपूर्ण माहिती एका क्लिकवर..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल