भारतीय सैन्यदलासाठी स्पेशल बुलेट प्रूफ जॅकेट तयार, AK-47 ही यापुढे होणार फेल, काय आहे यात असं विशेष?

Last Updated:

देशात मोठ्या संख्येने बाहेरुन बुलेट प्रूफ जॅकेट मागवली जात होती. त्यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत ऑर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरीत हे खास बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्यात आले आहे. येथील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हे जॅकेट तयार करण्यात आले आहे.

विशेष बुलेट प्रूफ जॅकेट
विशेष बुलेट प्रूफ जॅकेट
अखंड प्रताप सिंग, प्रतिनिधी
कानपुर : भारतीय सैन्यदलासाठी आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्यदलासाठी आता एक खास स्पेशल बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्यात आले आहे. देशातील सर्वात हलके असलेले हे बुलेट प्रूफ जॅकेट आहे आणि एके-47 मधील गोळीही यासमोर आपला प्रभाव दाखवू शकणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील कानपुर येथील ऑर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरीने हे स्पेशल बुलेट प्रूफ जॅकेट तयार केले आहे. कानपूर महानगरातील सहा संरक्षण युनिट्समध्ये संरक्षण क्षेत्रासाठी उपकरणे आणि शस्त्रे तयार केली जातात आणि ते सैन्यदलाला पुरवली जातात. कानपूरच्या ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरीत शस्त्रास्त्रांसोबतच सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी अनेक उपकरणे बनवली आहेत. यामध्ये प्रामुख्याने बुलेट प्रूफ जॅकेटचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून कानपूर येथील ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी बुलेट प्रूफ जॅकेट्स बनवत आहे. या जॅकेट्सला सैन्य आणि इतर दलांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
advertisement
या बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये काय आहे स्पेशल -
देशात मोठ्या संख्येने बाहेरुन बुलेट प्रूफ जॅकेट मागवली जात होती. त्यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत ऑर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरीत हे खास बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्यात आले आहे. येथील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हे जॅकेट तयार करण्यात आले आहे. जे भाभा कवच ऑर्डिनन्स फॅक्टरीने तयार केले होते, हे त्याचे अपडेटेड व्हर्जन आहे. याचेही वजनही त्यापेक्षा खूप कमी तसेच किंमतही खूप कमी आहे.
advertisement
देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट -
आधी जे जॅकेट भाभा कवच ऑर्डिनन्सइक्विपमेंट फॅक्टरीने तयार केले होते, त्याचे वजन हे 10 किलो होते आणि किंमत 1 लाख 40 हजार होती. तर आता हे जे नवीन जॅकेट तयार करण्यात आले आहे, याचे वजन हे फक्त साडेसहा किलो आहे आणि किंमत ही 84 हजार आहे.
advertisement
हे जॅकेट खूप स्पेशल जॅकेट आहे. एके-47 सारखी रायफलही यावर आपला प्रभाव दाखवू शकणार नाही. वजनाने हलके असल्याने घालायलाही हे सोपे राहणार आहे. तसेच यासोबत काही अनेक कंपार्टमेंट बनवण्यात आले आहे. यामध्ये सैनिक अनेक प्रकारचा सामान ठेऊ शकतील.
advertisement
केरळ पोलिसांना दिली खेप
या खास बुलेट प्रूफ जॅकेटची पहिली खेप ही केरळ पोलिसांना देण्यात आली आहे. यासोबतच या जॅकेटच्या पुरवठ्याबाबत अनेक दलांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच देशातील विविध दलांचे सैनिक हे स्पेशल बुलेट प्रूफ जॅकेट घालताना दिसतील.
view comments
मराठी बातम्या/देश/
भारतीय सैन्यदलासाठी स्पेशल बुलेट प्रूफ जॅकेट तयार, AK-47 ही यापुढे होणार फेल, काय आहे यात असं विशेष?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement