धाराशिव: रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. देशभरातून लाखो शिवभक्त या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला रायगडावर उपस्थित राहिले. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 153 शिवभक्त यावेळी रायगडावर उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने त्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी देखील देण्यात आली होती. ती जबाबदारी तुळजाई प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी पार पाडली.
advertisement
शिरकाई देवीचा गोंधळ
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या अगोदर परंपरेनुसार गड देवता आई शिरकाई देवीच्या मंदिरात जागरण गोंधळ करण्याची पारंपारिक प्रथा आहे. या कार्यक्रमाचे नियोजन भूम येथील शिवभक्तांकडे होतं. परंपरेनुसार हा गोंधळ पारंपारिक गोंधळी यांच्याकडून घातला जातो. परंपरेनुसार काही प्रमुख मंडळी या जागरण गोंधळाला उपस्थित असतात. या जागरण गोंधळाचे नियोजन भूम येथील 153 शिवभक्तांकडे होतं. त्यांनी हा जागरण गोंधळ कार्यक्रम यशस्वी संपन्न केला.
कशा पद्धतीने बसवला होता मेघडंबरीवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा? पाहा रोमांचकारी अनुभव
मर्दानी खेळ आणि गर्दी नियंत्रण
तुळजाई प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल आण्णा बाराते यांच्यासोबत 153 शिवभक्त रायगडावर गेले होते. जागरण गोंधळाचे उत्कृष्ट नियोजन केल्यानंतर त्यांच्यावरती गर्दी नियंत्रण आणि मर्दानी आखाडा खेळ प्रात्यक्षिक सादर करण्याची जबाबदारी दिली होती. या तीनही जबाबदाऱ्या या शिवभक्तांनी पार पार पाडल्या.
रायगडाचे पावित्र्य जपूया..
रायगडावर शिवभक्तांची वर्षभर मोठी गर्दी असते. त्यातच शिवराज्याभिषेक दिन सोहळा निमित्त मोठ्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर येतात. परंतु आलेल्या सर्व शिवप्रेमींनी रायगडावरती रिकाम्या पाण्याच्या बॉटल टाकू नयेत. आपण आणलेली पाण्याची बॉटल आपणच रायगडाच्या खाली न्यायला पाहिजे. जेणेकरून आपल्या रायगडाचे पवित्र्य आपणच जपायला हवं. यासाठी तुळजाई प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी रायगडावरून जाताना रिकाम्या बॉटल गोळा केल्या आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावली, असेही बाराते यांनी सांगितले.
रायगडावर सेवा करण्याची संधी
"दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा समितीने आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पडली आहे. रायगडावर आमच्या तुळजाई प्रतिष्ठानच्या वतीने 153 शिवभक्त उपस्थित होते. आमच्यातील शिवभक्तांनी पारंपारिक मावळ्यांची वेशभूषा देखील परिधान केले होती. जागरण गोंधळाचे नियोजन त्याचबरोबर गर्दी नियंत्रण आणि मर्दानी खेळ आखाड्याचे प्रात्यक्षिक दाखवणे ही जबाबदारी आमच्यावरती देण्यात आली होती. ती आम्ही पार पाडली आहे. ही संधी आम्हाला मिळाल्याचा आनंद आहे," असे विठ्ठल बाराते यांनी सांगितले.