TRENDING:

VIDEO : डोंबिवलीत सोसायटीच्या निवडणुकीत बेक्कार राडा, मेंबर्समध्ये फ्री स्टाईल मारहाण, पोलिसांवरही हात उगारला

Last Updated:

सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भयंकर राडा झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत सदस्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dombivali News : रविवारी म्हटलं की सोसायटीची मिटींग आलीच. प्रत्येक सोसायटीत अशा मिटींग होत असतात.या मिटींगमध्ये भांडणाऱ्या आणि हाणामारीच्या घटना घडत असतात. पण या घटनेत सोसायटीच्या सदस्यांनी कळसच काढला. सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भयंकर राडा झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत सदस्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतक्यावरच ही घटना थांबली नाही तर पोलिसांना देखील या घटनेत मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
dombivali news society election
dombivali news society election
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या एका सोसायटीत संचालर पदाची निवडणुकीत सूरू होती. या निवडणुकी दरम्यान मोठा राडा झाला होता. सदस्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला होता. या राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

advertisement

डोंबिवलीच्या खोणी तळोजा रोडवरील ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह सोसायटीत आज रविवारी संचालक पदाची निवडणूक सूरू होती. या निवडणुकीसाठी मतदान सूरू असताना अचानक बोगस मतदानाचा संशय आला.यातूनच सभासदांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या राड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओत एक चार पाच लोकांना स्टेजवर जाण्यापासून रोखताना दिसत आहे.या दरम्यानच सफेद कुर्ता घातलेला एक तरूण थेट स्टेजवर चढून एका व्यक्तीला मारहाण करत खाली आणतो.त्यानंतर तो पिडीत व्यक्ती पळताना दिसतो.या दरम्यान पोलिस समोर असताना देखील एक व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करताना दिसला आहे.त्यानंतर पीडित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असताना देखील त्याला मारहाणीची घटना घडते.

advertisement

दरम्यान पोलिसांनी यावेळी संबंधितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे.या घटनेने डोंबिवलीत खळबळ माजली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : डोंबिवलीत सोसायटीच्या निवडणुकीत बेक्कार राडा, मेंबर्समध्ये फ्री स्टाईल मारहाण, पोलिसांवरही हात उगारला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल