ठाण्यासह कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कल्याण शिळफाटा रोडवर मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवा परिसरात दोस्ती गृहसंकुल ते शिळफाटा रोडवर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे.
advertisement
डोंबिवली बदलापूर महामार्ग पाण्याखाली
तर डोंबिवली बदलापूर महामार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर पुराचं स्वरूप आहे. नेवाळी येथे महामार्गाला नदीचे स्वरूप आलं आहे. त्यामुळे अनेक गाड्या या पाण्याखाली गेल्या आहेत. परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची भीती वर्तवली जात आहे. पावसांची संततधार सुरू आहे. महामार्गावर अनेक वाहन बंद पडली आहे.
मानपाडा पोलीस स्टेशन आणि कल्याण लोहमार्ग ठाण्यात पाणी शिरलं
तर, मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचलं आहे. स्टेशनमध्ये कोठडी पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे स्टेशनमध्ये पाणी पंपाच्या मदतीने उपसून बाहेर काढलं जात आहे. पाणी शिरल्यामुळे स्टेशनमध्ये कामकाजावर परिणाम झाला आहे.
तर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी शिरलं आहे. पोलिसांच्या स्वागत कक्ष आरोपी ठेवण्याचा लॉकअपसह खालच्या पॅसेजमध्ये पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. कल्याणमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढताच अनेक सखल भागांत पाणी साचू लागलं आहे. अगदी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरलं असून पोलिसांचे दैनंदिन कामकाज अडथळ्यांत सापडले आहे. लोहमार्ग पोलिसांनी पंपाच्या मदतीने पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने पोलीस तालुक्यातील स्वागत कक्ष असेल आरोपीचे लॉकअप असेल या ठिकाणी देखील पाणी साचल्यानं पोलिसांना या पाण्याचा उभा राहून कामकाज करावे लागत आहे, याचा आढावा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातून घेतला आहे.