दरम्यान हा ठराव दिनांक 19 डिसेंबर 1988 रोजी तत्कालीन कल्याण महापालिका मंजूर करण्यात आला होता. या ठरवाची पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. सदर ठरवात 15 ऑगस्टसह गांधी जयंती, महावीर जयंती, सर्वत्सरी, गणेश चतुर्थी आणि 15 नोव्हेंबर रोजी सुद्धा चिकन मटण विक्रीसाठी बंदी घातली आहे.
दरम्यान, आता या निर्णयाला स्थानिक स्थरातून विरोध होताना दिसतोय आणि निर्णयाविरोधात हिंदू खाटिक समाजाने आक्रमक पवित्र घेतला असून १४ ऑगस्टपर्यंत निर्णय मागे घेतला नाहीतर १५ ऑगस्ट रोजी सकाळी मुख्यालयासमोर मटणाचे दुकान टाकणार असा इशारा हिंदू खाटीक समाज संघटनेनं केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. तर काही नागरिकांनी सुद्धा पालिकेच्या काढलेल्या आदेशला विरोध दर्शवला आहे. तर चिकन-मटण विक्रेत्यांना भुर्दंड पडला आहे.
advertisement
1988 मध्ये काय केला होता ठराव?
दिनांक 19/12/88 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सादर केलेल्या निवेदनाचा विचार करता महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याच्या अधिसूचनेनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार भोसले प्रशासक कल्याण महापालिका कल्याण महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे पत्र क्रमांक जी ई एन /1087/1286/सी आर- 93/87 दि. 22.4.87 मध्ये देण्यात आलेल्या शासनाच्या सल्ल्यानुसार कल्याण महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व कत्तलखाने (लहान मोठ्या जनावरांचे) वर्षांमध्ये खालील उल्लेख केलेल्या दिवशी बंद ठेवण्यात प्रशासकीय मंजुरी देत आहे.
या दिवशी बंदी..
गांधी जयंती
महावीर जयंती
15 ऑगस्ट
गणेश चतुर्थी
15 नोव्हेंबर
दरम्यान, या निर्णयाला सर्वात पहिले विरोध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आणि विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी निर्णयाला समर्थन दिलं आहे. त्यामुळे आतातरी पालिका हा निर्णय पाठी घेणार का हे पाहावे लागेल.