शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण संस्था (NESTS) च्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलने “प्राचार्य, पीजीटी शिक्षक, वसतिगृह वॉर्डन (पुरुष), ज्युनियर सचिवालय सहाय्यक (लिपिक), लेखापाल, महिला कर्मचारी नर्स, टीजीटी शिक्षक, वसतिगृह वॉर्डन (महिला), लॅब अटेंडंट” या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण संस्थेने या पदासाठी 18,000 ते 78,000 पर्यंत मासिक वेतन ठेवले आहे.
advertisement
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मध्ये दिलेल्या जाहिरातीत एकूण 7267 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचण्याची विनंती शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. जाहिरातीच्या PDF ची लिंक आणि अर्जाची लिंक बातमीमध्ये देण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2025 आहे. नोकरीचं ठिकाण जाहिरातीमध्ये नमूद केलेलं नाही. अर्जदारांनी अधिकाधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF एकदा वाचावी. त्यामध्ये भरती संबंधीची सर्व माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
जाहिरातीच्या PDF मध्ये अर्जदारांना कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, याबद्दलची माहिती समजेल. प्रत्येक पदाप्रमाणे जातनिहाय नोकरभरती केली जाईल. कोणत्या जातीसाठी किती जागा आहेत, याची माहिती अर्जदारांना जाहिरातीच्या PDF मध्ये मिळेल. ऑनलाईन पद्धतीने ही नोकरभरती केली जाणार असून MCQ पद्धतीने पेपर असेल. परीक्षेसंबंधीची माहिती सुद्धा अर्जदारांना जाहिरातीच्या PDF मध्ये मिळेल.