सर्वप्रथम त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळवून देण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. स्नानानंतर लगेचच शरीरावर हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो. कोरड्या त्वचेसाठी कोकोबटर, अॅलोवेरा, व्हिटॅमिन ई किंवा बदाम तेल युक्त क्रीमचा वापर फायदेशीर ठरतो. तसेच, फेसवॉश किंवा साबण निवडताना तीव्र रसायनांशिवाय असलेले माइल्ड प्रॉडक्ट वापरावेत, कारण कठोर रसायनांमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते.
advertisement
Mental Health Day 2025 : मानसिक आजार आणि भूतबाधेचा काही संबंध असतो का? डॅाक्टरांनी स्पष्ट सांगितलं
हिवाळ्यात पाण्याचे सेवन कमी होते, मात्र हे टाळणे गरजेचे आहे. शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे. याशिवाय आहारात ताजे फळे, भाज्या, सुका मेवा आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडयुक्त पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ त्वचेला आतून पोषण देतात आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवतात.
थंड वातावरणात वारंवार गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवयही त्वचेवर विपरीत परिणाम करते. गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल कमी करून कोरडेपणा वाढवते. त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याने स्नान करावे. तसेच, आंघोळीनंतर लगेच टॉवेलने जोरात चोळण्याऐवजी हलक्या हाताने पुसावे आणि लगेच मॉइश्चरायझर लावावे.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरीही सनस्क्रीनचा वापर विसरू नये. अल्ट्राव्हायोलेट किरणे ढगांमधूनसुद्धा त्वचेवर परिणाम करतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी किमान SPF 30 असलेला सनस्क्रीन लावावा. याशिवाय ओठांवर लिप बाम आणि पायांवर पेट्रोलियम जेली लावल्यास कोरडेपणापासून संरक्षण मिळते. या सर्व साध्या उपायांचा अवलंब केल्यास हिवाळ्यातही त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते.