एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाला निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह धनुष्यबाण आणि अधिकृत पक्षाचा दर्जा दिला. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने धाव घेतली. आता या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता बळावली आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर आता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातील वादासंदर्भात राष्ट्रपतींनी मागवलेल्या सल्ल्यासाठी घटनापीठाची स्थापना केली आहे. या सुनावणीच्या कारणास्तव शिवसेना प्रकरण पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे या घटनापीठाचे सदस्य आहेत. शिवसेना वादाची सुनावणी आता 8 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. याआधी संगणक प्रणालीत 20 ऑगस्टची तारीख निश्चित झाली होती. मात्र, राष्ट्रपती सल्ला प्रकरणाच्या सुनावण्या 19 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्यामुळे शिवसेना प्रकरणाचा निकाल पुढे गेला आहे.
advertisement
या वादात सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर निकाल?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी, “या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत, आता एकदाच निकाल देऊ,” असे स्पष्ट केले होते. निकाल स्थानिक निवडणुकीच्या अगदी तोंडावर आल्यास, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.