TRENDING:

Eknath Shinde Ganesh Naik : नवी मुंबईतलं वातावरण तापलं! ‘तुमचे व्हिडिओ थिएटरमध्ये लावू’ – नाईकांविरोधात शिंदे गट आक्रमक

Last Updated:

Eknath Shinde Ganesh Naik : नवी मुंबईतील विकास कामांच्या मु्द्यावरून नाईक यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आता शिंदे गटाकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाईकांच्या नालायकपणाचे Video थिएटरमध्ये लावू, शिंदे गट आक्रमक, नवी मुंबईतलं वातावरण तापलं
नाईकांच्या नालायकपणाचे Video थिएटरमध्ये लावू, शिंदे गट आक्रमक, नवी मुंबईतलं वातावरण तापलं
advertisement

नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील वादाचा वणवा पेटू लागला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महायुतीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. नवी मुंबईतील विकास कामांच्या मुद्यावरून नाईक यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आता शिंदे गटाकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागली आहे. नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ थिएटरमध्ये लावणार असल्याचा इशारा शिंदे गटाने दिला.

advertisement

एकनाथ शिंदेंविरोधात ठाण्यात भाजपकडून गणेश नाईक हे मोर्चेबांधणी करत आहेत. त्याशिवाय, नवी मुंबईतील होम पिचवरही नाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाईकांच्या आक्रमकतेमुळे महायुतीमध्ये ठाणे आणि नवी मुंबईत आलबेल नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. शनिवारी नवी मुंबईत शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी नाईकांवर आरोपांचे वार केले.

advertisement

तुमचे व्हिडीओ थिएटरमध्ये लावू...

आमच्या नेत्यांना नालायक म्हणणारे गणेश नाईक स्वतःच नालायकपणाची व्याख्या आहेत. त्यांच्या नालायकपणाचे व्हिडिओ पूर्वी नवी मुंबईत फिरले, नंतर सोशल मीडियावर गाजले; आणि भविष्यात हेच व्हिडिओ महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात दाखवू,” असा इशारा खासदार म्हस्के यांनी दिला. राज्यात महायुतीचे सरकार असतानाही गणेश नाईक हे वारंवार उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत आहेत, दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत, असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. “यापुढे अशा प्रकारची वक्तव्ये केल्यास सर्वसामान्य शिवसैनिकसुद्धा त्याच भाषेत उत्तर देतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

advertisement

शिंदेंमुळे काहींना मंत्रिपद...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत गोड-धोड खायला नको वाटतं? तर हा पदार्थ ट्राय करा, बाकरवडीही फिकी!
सर्व पहा

म्हस्के पुढे म्हणाले की, “नवी मुंबईतील भूमिपुत्र, माथाडी कामगार आणि झोपडपट्टीधारकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाढीव एफएसआयसह 14 नव्या गावांसाठी 70 कोटींचा निधी दिला आहे. काही वर्षांत नवी मुंबईच्या विकासाची गंगा त्यांनी आणली आहे. यामुळेच गणेश नाईक यांना चिडचिड होते आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांमुळे कंडोनियम प्रकल्पांना आता नागरी सुविधा मिळणार आहेत. जेव्हा गणेश नाईक मंत्री होते, तेव्हा हे निर्णय का झाले नाहीत? असा सवालही म्हस्के यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांमुळेच काहींना अनेक वर्षांनी मंत्रिपद मिळाले हे विसरून चालणार नाही, असा टोलाही खासदार म्हस्के यांनी गणेश नाईक यांना लगावला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Ganesh Naik : नवी मुंबईतलं वातावरण तापलं! ‘तुमचे व्हिडिओ थिएटरमध्ये लावू’ – नाईकांविरोधात शिंदे गट आक्रमक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल