TRENDING:

BJP : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंवर जीवघेणा हल्ला, गाडीवर दगडफेक

Last Updated:

बीडच्या केज मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी
भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंवर जीवघेणा हल्ला, गाडीवर दगडफेक
भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंवर जीवघेणा हल्ला, गाडीवर दगडफेक
advertisement

बीड : बीडच्या केज मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली गावात ही घटना घडली आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आटपून संगीता ठोंबरे परत जात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे.

या हल्ल्यात संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालक किशोर मोरे जखमी झाले आहेत. संगीता ठोंबरे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका का करण्यात आला? याचा तपास पोलीस करत आहेत. या संदर्भात केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंवर जीवघेणा हल्ला, गाडीवर दगडफेक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल