मागच्या वर्षी 60रु किलो असलेली फुले यावर्षी 120 रु किलो झालेत म्हणजे दुप्पट भाव वाढला असे म्हटले.परंतु विक्रेत्यांना मिळालेला फुलांचा भाव हा जास्त पैसे मोजावे लागल्यानी त्यांनी ग्राहकांना ही भाव वाढवला.दसरा तोंडावर आल्याने विक्रीसाठी आठवडा भर आधी फुलांच्या माळाची साठवूनक करून ठेवली असता. मुसळधार पावसाने साठवलेली फुले ओळी झाली असून ती पूजेसाठी किंवा हार,तोरण यांच्या वापरण्या योग्य नसल्याने ती फुले फुकट गेली आहेत.
advertisement
त्यामुळे विक्रेत्यांना एकीकडे मागणी वाढली म्हणून ग्राहकांना तोंड द्यावे लागते तर दुसरीकडे पैसे देऊन फुकट गेलेला माळ त्याचा तोटा स्वीकारावा लागतो. एकंदरीत या वर्षी विक्रेता वर्ग हा जास्त नफा मिळू शकत नाही असे फुल विक्रेते लक्ष्मीबाई म्हणाल्या. विक्रेत्यांना 10 वर्ष तर कोणाला 20 वर्षाचा अनुभव असेल विक्रते फुलांच्या किंमती वाढल्याने नाराज आहे.मागच्या आठवड्यात पावसामुळे फुलांची किंमत 30 रु किलो होती नाय आता अचानक 120 रु किंमत झाली.सोन्यासारखा भाव फुलांचा वाढतो असे ग्राहक म्हणतात.
पण नुकसान झालेले विक्रेते आज शांत बसून बाजाराचा अंदाज घेत आहेत.दसऱ्यानंतर फुलांची मागणी पुन्हा कमी होईल यामुळे उरलेला माळ पुन्हा कमी दरात विकावा लागेल.त्यामुळे आलेल्या दसरा सणाचे आनंदात स्वागत करत आहेत. या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध करून विजय मिळवला होता, तसेच भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला होता. वाईटावर चांगल्याचा विजय, वाईट प्रवृत्तींचा नाश आणि नवीन कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. या दिवशी रावण दहन केले जाते आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात.