TRENDING:

सिंहगडावर चालली होती कार, रक्षकांनी प्रश्न विचारताच वाहनातील चौघांचे बदलले हावभाव, समोर आला धक्कादायक प्रकार

Last Updated:

पुणे शहरातून सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारमधून जाणाऱ्या चौघांना सुरक्षा रक्षकांनी प्रश्न विचारताच त्यांचे हावभाव बदलले अन्...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे शहरातून सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगडावर फिरायला जाणारे चार तरुण गडावर मद्य घेऊन जात होते. पण संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. सुरक्षा रक्षकांनी कारमधून मद्य जप्त केलं आहे. सिंहगडावर जाणाऱ्या वाहनातून मागील २१ दिवसांत दुसऱ्यांदा अशाप्रकारे मद्य आढळल्याने खळबळ उडाली आहे.
डावीकडील फोटो (AI generated)
डावीकडील फोटो (AI generated)
advertisement

खरं तर, छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या गडकिल्ल्यांवर मद्य प्राशन करण्याचे यापूर्वी अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशात सिंहगडावर असं कृत्य करण्यास बंदी आहे. असं असताना काही पर्यटक मद्य घेऊन जाताना आढळत आहेत. २१ दिवसांत दुसऱ्यांदा असा प्रकार उघडकीस आल्याने सिंहगडाच्या पावित्र्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान मुंबई आरटीओच्या अंतर्गत नोंद असलेली एक कार सिंहगडाच्या दिशेने निघाली होती. ही कार गोळीवाडी येथील वनविभागाच्या उपद्रवशुल्क नाक्यावर आली असता, सुरक्षा रक्षकांनी हे वाहन तपासणीसाठी थांबवले. उपद्रवशुल्क घेत असताना संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी वाहनचालकांना गाडीत मद्य आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिले. तसेच धूम्रपानाचे साहित्य आहे का? असे विचारल्यावर त्यांनी सिगरेट दाखवली. सुरक्षा रक्षकांनी सिगरेट जप्त केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याची कमाल, 30 गुंठ्यात 90 टन घेतलं ऊस उत्पादन, अख्खं गाव पाहतच राहिलं!
सर्व पहा

दरम्यान, वाहनातील चारही व्यक्तींचे हावभाव संशयास्पद वाटल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना वाहनातून खाली उतरून तपासणीस सहकार्य करण्यास सांगितले. वाहनाची तपासणी केली असता सीटखाली मोठी मद्याची बाटली आढळून आली. हा प्रकार उघडकीस येताच सुरक्षा रक्षकांनी संबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली.सिंहगड परिसर वनविभागाच्या अखत्यारित असून तो पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अंतर्गत संरक्षित क्षेत्रात येतो. त्यामुळे येथे मद्यपान, धूम्रपान आणि मांसाहारास सक्त मनाई आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिंहगडावर चालली होती कार, रक्षकांनी प्रश्न विचारताच वाहनातील चौघांचे बदलले हावभाव, समोर आला धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल