अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील रहिवासी कल्पना राऊत ही पती, सासू, सासरा, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासोबत राहत होती. पहाटे 5 वाजताच्या सुमारास घराच्या दरवाजासमोर ती नित्यनेमाने बसली होती. कल्पनाला याचा अंदाजही नव्हता की आपला काळ आला आहे. घराच्या पडवीत बसलेल्या कल्पनाच्या हाताला अचानक विषारी सापाने चावा घेतला. दरम्यान, कल्पनाने आरडाओरड केल्यानंतर घरातील मंडळी धावून आली. दरम्यान, चावा घेणाऱ्या त्या सापाला पकडून ठेवण्यात आले. विषारी साप असल्याने कल्पनाची प्रकृती खालावली. लगेच तिला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून गोंदियाला हलविले.
advertisement
वाचा - बीडमध्ये लोकसभेपूर्वीच वातावरण तापलं; आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत मारहाण
गोंदियाला नेत असतानाच वाटेतच कल्पनाचा मृत्यू झाला. कल्पनाच्या मृत्यूने राऊत कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात पती, पंधरा वर्षांची मुलगी, बारा वर्षांचा मुलगा, सासू व सासरे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात कल्पनाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले, असून कल्पना राऊत यांच्या कुटुंबीयांना वनविभागाने त्वरित मदत करण्याची अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
