Beed News : बीडमध्ये लोकसभेपूर्वीच वातावरण तापलं; आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत बेदम मारहाण
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे आमदाराच्या स्वीय सहायकाला रस्त्यावर खेचत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
बीड, (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील वातावरण गरम झालं आहे. शहरापासून खेड्यापर्यंत प्रचाराचा धुरळा उडत आहे. अशात माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा स्वीय सहायक महादू सोळंके याला भर चौकात मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या महादू सोळंके यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव शहरांतील रंगोली कॉर्नरवर काल (5 एप्रिल) ही दुपारी मारहाण करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांनी ही माराहाण केल्याची माहिती आहे.
जाळपोळीत नाव गोवल्याचा आरोप
शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहायकाला भररस्त्यात मारहाण झाली. मराठा आंदोलनादरम्यान माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती. यामध्ये आमची नावं विनाकारण का गोवली? असा जाब विचारत आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना मारहाण करण्यात आली आहे. माजलगावातील रंगोली कॉर्नरवर हा हल्ला झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का?' असे म्हणत सलूनमध्ये शेवींग करत असलेल्या महादू सोळंकेंना बाहेर ओढत आणून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या मारहाणीचे मोबाईलवर चित्रिकरणही करण्यात आले.
advertisement
शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून उपजिल्हाप्रमुखावर हल्ला
view commentsबीड (Beed) जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची घटना घडली. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला केला. या घटनेत उपजिल्हाप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीमध्ये शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखचं मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत लावण्यात आलेल्या बॅनरवरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
April 06, 2024 4:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News : बीडमध्ये लोकसभेपूर्वीच वातावरण तापलं; आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत बेदम मारहाण


