पाकिस्तानच्या मनात चाललंय काय? इथले लोक Google वर काय सर्च करतात? गुगलचा डेटा पाहून धक्का बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
2025 वर्ष संपत आला आहे आणि अलीकडेच Google ने पाकिस्तानच्या सर्च ट्रेंड्सची माहिती जाहीर केली आहे. या ट्रेंड्समधून तिथल्या लोकांचे इंटरेस्ट, गरजा आणि बदलती जीवनशैली दिसून येते. चला, जाणून घेऊया पाकिस्तान्यांच्या मनातील 'टॉप सर्च' विषय कोणते आहेत.
आपल्या शेजारील देश पाकिस्तान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. राजकीय अस्थिरता असो, आर्थिक चढ-उतार असो किंवा क्रिकेटची मॅच... तिथल्या घडामोडींबद्दल आपल्याला उत्सुकता असतेच. पण, तुम्हाला माहीत आहे का, की पाकिस्तानमधील सामान्य जनता त्यांच्या दैनंदिन जीवनात इंटरनेटवर, विशेषतः Google वर सर्वाधिक काय शोधत असते?
advertisement
advertisement
क्रिकेटची क्रेझ अजूनही टॉपवरभारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही क्रिकेटचा फिव्हर जबरदस्त आहे. 'क्रिकेट' कॅटेगरीमध्ये लोकांनी सर्वात जास्त Pakistan vs South Africa हा सामना शोधला. तर टॉप 5 मध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL), आशिया कप (Asia Cup), Pakistan vs India आणि Pakistan vs New Zealand या महत्त्वाच्या स्पर्धा आणि सामन्यांचा समावेश आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, राजकीय संबंध कसेही असले तरी क्रिकेटचे सामने हा दोन्ही देशांच्या लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
advertisement
Technology : 'अपडेटेड' राहण्याची तीव्र इच्छापाकिस्तानमध्ये महागाई आणि आर्थिक समस्या असल्या तरी, तंत्रज्ञानाच्या बाबतीत इथले लोक स्वतःला अपडेटेड ठेवत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सर्च ट्रेंड्स!सगळ्यात जास्त सर्च: 'टेक्नोलॉजी' कॅटेगरीत लोकांनी गुगलच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रॉडक्टपैकी एक असलेल्या Gemini (जेमिनी) ला सर्वात जास्त सर्च केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
एवढंच नाही तर 'कसे करावे?' (How-To) मध्ये आर्थिक आणि सोशल मीडियाचे प्रश्न जास्त सर्च केले गेल. जेव्हा सामान्य लोकांना एखादी अडचण येते, तेव्हा ते सरळ Google ला विचारतात. 'कसे करावे' (How To Searches) या कॅटेगरीत पाकिस्तान्यांच्या दैनंदिन गरजा आणि समस्या स्पष्टपणे दिसतात कारणयामध्ये ते खालील गोष्टी सर्च करतात.
advertisement
How to check e-challan Karachi (कराची ई-चलन कसे तपासावे): वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होत असल्याचे हे लक्षण आहे.How to see unsent Instagram messages : सोशल मीडियाच्या गोपनीयतेबद्दलची लोकांची उत्सुकता यातून दिसते.How to do car insurance (कार विमा कसा काढायचा): सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे.How to invest in crypto market (क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी)How to invest in stock market (शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी)
advertisement
advertisement
इतर टॉप सर्च विषय सर्वाधिक सर्च ॲथलीट (Athletes)अभिषेक शर्मा (याशिवाय हसन नवाज, इरफान खान नियाझी) लोकल न्यूज (Local News) Punjab Socio-Economic Registry (पंजाब सामाजिक-आर्थिक नोंदणी) रेसिपी (Recipe) सँडविच रेसिपी (Sandwich Recipes) ड्रामा (Drama), Sher (शायद, तिथली एखादी लोकप्रिय टीव्ही मालिका)
advertisement
या सर्च ट्रेंड्सच्या माध्यमातून पाकिस्तान्यांच्या मनातील काही गोष्टी स्पष्ट होतात. लोकांना त्यांच्या स्थानिक समस्या (उदा. ई-चलन) आणि सरकारी योजना (उदा. पंजाबची नोंदणी) याबद्दल माहिती हवी आहे. आर्थिक समस्या असूनही, लोक तंत्रज्ञान (Gemini, iPhone 17) आणि गुंतवणूक (Crypto, Stock Market) यामध्ये रस घेत आहेत. क्रिकेट, ड्रामा आणि सोशल मीडिया हे त्यांच्या मनोरंजनाचे मुख्य स्रोत आहेत. थोडक्यात, पाकिस्तानमधील लोक आजच्या समस्यांवर उपाय शोधत असले तरी, ते उद्याच्या प्रगतीसाठी आणि तंत्रज्ञानाशी जोडून राहण्यासाठी Google चा वापर करत आहेत, हे या ट्रेंड्समधून स्पष्ट होते.











