TRENDING:

'जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा' ज्या काळ्या गाडीत बर्गेंनी स्वत: ला संपवलं, तेव्हा पूजाचं लोकेशन आलं समोर

Last Updated:

माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे विवाहित असून एका नर्तिकेच्या प्रेमात पडले. नुसते प्रेमात पडले नाहीतर पैसे, सोनं नाणंही उधळलं. याचाच फायदा घेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रितम पंडित, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सोलापूर: प्रेमाची व्याख्या ही खरंतर निष्पाप आणि सुंदर आहे. पण, स्वार्थ आणि हव्यासा जेव्हा माणसाच्या डोक्यात शिरतो तेव्हा प्रेमाची व्याख्या तिथे बदलून जाते. बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे विवाहित असून एका नर्तिकेच्या प्रेमात पडले. नुसते प्रेमात पडले नाहीतर पैसे, सोनं नाणंही उधळलं. याचाच फायदा घेत पूजा गायकवाडने गोविंदचा मरणाच्या दारावर नेऊन ठेवलं. ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली, तेव्हा पूजा कुठे होती, याची माहिती समोर आली आहे.

advertisement

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची राज्यभरात बरीच चर्चा रंगली आहे. गोविंद बर्गे हे बार्शीतील एका कला केंद्रात जात होते. तिथे ते पूजा गायकवाड नर्तिकेच्या प्रेमात पडले होते. तिने जेव्हा ब्लॅकमेलिंग सुरू केलं, त्यानंतर वैतागून बर्गे यांनी तिच्याच घरासमोर येऊन कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली.

advertisement

('इश्क में तेरे हम...' किलर पूजानं आता उघडलं तोंड, गोविंद बर्गेंबद्दल धक्कादायक कबुली)

गोविंद शोधत पूजाच्या घरी पोहोचले

गोविंद बर्गे यांनी पूजावर पैसे, सोनं सगळं काही उधळलं होतं. तिने जे जे मागितलं ते सगळं तिला दिलं. पण, जेव्हा पूजाने गोविंदचं घरचं मागितलं तेव्हा गोविंदला धक्का बसला. त्याने पूजाला राहतं घर देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. कालपर्यंत आपलं ऐकणारी पूजा अचानक अशी का वागतेय, हे गोविंद बर्गेंना समजेना झालं. चार ते पाच दिवस झाले. पूजा गोविंद यांचा फोन घेत नव्हती. एवढंच नाहीतर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती. पूजाने धमकी दिल्यामुळे गोविंद हे उद्गिग्न झाले होते. त्यामुळे गोविंद हे गेवराईतून निघाले आणि बार्शीतील वैराग इथं पोहोचले. या ठिकाणी पूजाचं घर होतं. तिच्या घराबाहेर थांबून त्यांनी तिला बरेच फोन केले. पण, त्यावेळी पारगाव येथील कला केंद्रात पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची पोलिसांची माहिती दिली आहे.

advertisement

गोविंद फोन करून थकला आणि स्वत: ला घेतलं संपवून 

पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आहे.  पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैरागजवळ आला होता. तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते. आता  गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे. एवढंच नाहीतर तिने गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनी पोलिसांना  कबुली दिली आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे पोलीस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे.

advertisement

काय आहे प्रकरण?

गोविंद कला केंद्रात (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड नावाची ही नर्तिक आहे. गोविंद बर्गे हे तिचा डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले. हा प्रेमाचा खेळ दीड वर्ष सुरू होता. पण, जसे जसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले, तशा त्यांच्या अडचणी वाढल्या. पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं, मोबाईल असे अनेक गिफ्ट मागितले. प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा आयफोन मोबाईलही दिला होता.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हा पुजाच्या घरासमोर आला होता. नर्तिकाच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूल मधून गोळी गोविंदने उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर करून घेतली. यात गोविंदा जागीच मृत्यू झाला. अखेरीस गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोविंद हा विवाहित होता त्याला एक नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता. याप्रकरणी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली असून आता ती पोलीस कोठडीत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा' ज्या काळ्या गाडीत बर्गेंनी स्वत: ला संपवलं, तेव्हा पूजाचं लोकेशन आलं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल