फुरकान अब्दुल रझाक बच्चेभाई वय 27 रा. साखर पेठ सोलापूर यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. शिक्षण शिकूनही कित्येक जणांना नोकरी लागत नसल्याने पुढील शिक्षण न घेता वडिलांनी 2000 साली सुरू केलेल्या बाबा खिचडा व्यवसाय पुढे नेण्याचं फुरकान यांनी सुरू केला.2014 साली बारावी पास झाल्यानंतर या व्यवसायाची वडिलांकडून माहिती घेतली आणि हा व्यवसाय सोलापूर शहरात मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यात कसा पोहोचता येईल याकडे फुरकानने लक्ष केंद्रित केलं. आज सोलापूर शहरातील बाबा खिचडा संपूर्ण सोलापूर जिल्हासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, हैदराबाद, तेलंगणा, तामिळनाडू विक्रीसाठी पाठवला जात आहे. तर या व्यवसायातून फुरकान महिन्याला 5 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
advertisement
असं बनवला जातो खिचडा
खिचडा तयार करत असताना त्यामध्ये गहू, तांदूळ, मसूर डाळ, चना दाळ, मुग डाळ, तांदूळ, अख्खा मसुर दाळ, ज्वारी इत्यादी पदार्थ टाकून हा खिचडा तयार केला जातो. तसेच ते बनवण्यासाठी खिचडा मसाला बनवून 500 ग्रॅम व 1 किलोच्या पाकीट मध्ये टाकले जाते.500 ग्रॅम खिचडा पाकीट 70 रुपये तर 1किलो खिचडा पाकीट 120 रुपये किलो दराने विक्री केला जातो. तसेच फुरकानने बाबा खिचडा सोबतच बाबा बदाम खीर, नानी के गुलगुले, खिचडा मिक्स, कद्दू की खीर आधी नवीन प्रॉडक्ट बनवले आहे. वडिलांनी बनवलेला ब्रँड संपूर्ण देशासह बाहेर देशात कसा विक्री करता येईल हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून फुरकान पुढे जात आहे.