कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने धुमशान घातलं आहे. अशातच मुंबईतील कुलाबा हवामान विभागाने ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली परिसरातील अनुदानित- विना अनुदानित शाळांना अतिवृष्टीमुळे दिनांक १८/०८/२०२५ आणि १९/०८/२०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा विचार करून कल्याण डोंबिवली क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या पुर्व प्राथमिक / प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक/खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना दि. १८/०८/२०२५ आणि १९/०८/२०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
advertisement
(Mumbai School: पावसाचा तडाखा, मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी, ६ महापालिकांनी आदेश काढला)
१८ तारखेला दुपार सत्रातील चालू असणा-या शाळांतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आली होती. तसंच मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय शाळा मुख्यालय सोडू नये, असेही आदेश दिले होते. आता १९ तारखेलाही शाळांना सुट्टी दिली आहे. १८/०८/२०२५ आणि १९/०८/२०२५ रोजी नियोजित असणारी सर्व प्रशिक्षणं, परिक्षा, इत्यादी नजीकच्या काळामध्ये आपल्या स्तरावर पूर्ण करण्याचे नियोजन करण्याची सूचनाही शाळांना दिली आहे.