Mumbai School: पावसाचा तडाखा, मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी, ६ महापालिकांनी आदेश काढला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
School Holiday Due to Heavy Rainfall: मुंबई आणि उपनगरांत तसेच पालघर जिल्ह्यांत गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. सखल भागांत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शाळकरी मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन विविध महापालिकांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई : मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील पाच महानगरपालिकांनी शाळांना सुट्टी देण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. खासगी शाळा, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच आश्रमशाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरांत तसेच पालघर जिल्ह्यांत गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. सखल भागांत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सोमवारी त्रास सहन करावा लागला. सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये जाणाऱ्या नोकरदार वर्गालाही लोकलसेवा धीम्या गतीने सुरू असल्याने लेट मार्क लागला. दुसरीकडे शाळेत जाणाऱ्या आणि शाळेतून सुटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसेस पाण्यात अडकल्याच्या घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी होत होती.
advertisement
शाळेला सुट्टी, ६ महापालिकांनी आदेश काढला
ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल या पाच महापालिकांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांनीही शाळांना सुट्टी देण्याबाबतचा आदेश काढला आहे.
नवी मुंबईत उद्या शाळांना सुट्टी
नवी मुंबईत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार नवी मुंबई क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीमुळे सदर दिवशी नियोजित सर्व परीक्षा, प्रशिक्षण व इतर कार्यक्रम नजीकच्या काळात शाळा स्तरावर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement
पनवेल महापालिकेने सुट्टीचा आदेश काढला
पनवेल महापालिकेने देखील पावसामुळे उद्या सुट्टी शाळेला जाहीर केली आहे. पालिका आणि खाजगी शाळांना महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाने सुट्टी उद्या जाहीर करण्यात आली आहे.
पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांनी सुट्टीचा आदेश काढला
ज्याअर्थी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक १९ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आलेला असून पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. वरील सर्व अवलोकन करता जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे. त्याअर्थी, मी, डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हाधिकारी पालघर, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२.०८.२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पालघर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करीत आहे.
advertisement
कल्याण डोंबिवलीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर
कल्याण डोंबिवली शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेता कल्याण डोंबिवली क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक/खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. आज दुपार सत्रातील चालू असणा-या शाळांतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची राहील. तसेच मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय शाळा मुख्यालय सोडू नये, असे
advertisement
मीरा भाईंदर महानगरपालिकेने आदेश काढला
जिल्ह्यात सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारत घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक / प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक / खाजगी अनुदानित/ विना अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते म्हणून १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai School: पावसाचा तडाखा, मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी, ६ महापालिकांनी आदेश काढला