कातील पूजाची उलटी गिनती सुरू, बर्गे मृत्यू प्रकरणी पोलीस स्टेशनमधून नवीन अपडेट

Last Updated:

माजी उपसरपंच गोविंद बर्गे  आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

News18
News18
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर:  बीड जिल्ह्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी एका डान्सर महिलेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डान्सर पूजा गायकवाडला अटक केली आहे. या पूजा नावाच्या डान्सरने  बर्गे यांच्याकडे अशा अशा मागण्या केल्या होत्या, त्यामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. या प्रकरणी पोलिसांनी पूजाला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
माजी उपसरपंच गोविंद बर्गे  आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर बार्शी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिला हजर करण्यात आलं. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पूजाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस पूजा आता पोलिसांच्या कोठडीत मुक्कामी असणार आहे.
advertisement
गोविंद बर्गेंची हत्या?
दरम्यान, माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याबद्दल नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. गोविंद बर्गे यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बर्गे यांच्याकडे बंदूक कधीच नव्हती, असंही नातेवाईकांचं म्हणणं आहे. मुळात घटनास्थळी बर्गे यांच्या कारची बॅटरी उतलेली होती. नर्तिका पूजाने त्यांना गावी बोलावून घातपात घडवून आणला, असा आरोप नातेवाईकांचा आहे.
advertisement
advertisement
काय आहे प्रकरण? 
गोविंद कला केंद्रात (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड नावाची ही नर्तिक आहे.  गोविंद बर्गे हे तिचा डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले. हा प्रेमाचा खेळ दीड वर्ष सुरू होता. पण, जसे जसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले, तशा त्यांच्या अडचणी वाढल्या. पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं, मोबाईल असे अनेक गिफ्ट मागितले. प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मोबाईलही दिला होता. पण पूजाचा आता गोविंदच्या घरावर डोळा होता. तिने घर नावावर करून देण्यासाठी तगादा लावला. यातून दोघांमध्ये वाद झाला. गोविंदने हे करायला नकार दिला. त्यामुळे पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हा पुजाच्या घरासमोर आला होता. नर्तिकाच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूल मधून गोळी गोविंदने उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर करून घेतली. यात गोविंदा जागीच मृत्यू झाला. अखेरीस  गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोविंद हा विवाहित होता त्याला एक नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता. याप्रकरणी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली असून आता ती पोलीस कोठडीत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कातील पूजाची उलटी गिनती सुरू, बर्गे मृत्यू प्रकरणी पोलीस स्टेशनमधून नवीन अपडेट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement