मुंबई आणि उपनगरमध्ये शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे दहीहंडी उत्सवात गोविंदा न्हाऊन निघाला. मात्र, संध्याकाळ होईपर्यंत पावसाने कुठेही उसंत घेतली नाही. संध्याकाळी ठाणे परिसरात पावसाचा जोर आणखी वाढला. दिवा, डोंबिवली आणि कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरूच होती. रात्री १० वाजेच्या नंतर ठाण्यासह दिवा, डोंबिवली, कल्याण, कल्याण ग्रामीण भागात पावसाचा जोर आणखी वाढला. जर रात्रभर असाच पाऊस सुरू राहिला तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
(Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात मुसळधार पाऊस, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट)
हवामान विभागाकडून अलर्ट
दरम्यान, मुंबई येथील कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दल अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने 17 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वर्तवली आहे. तर कोकणातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुण्यालाही अति मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईपाठोपाठ पुण्यालाही पावसाचा हायअलर्ट दिला आहे. पुण्याच्या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.