TRENDING:

IAS तुकाराम मुंढे यांना निलंबित करा, त्यांना अटक झाली पाहिजे, भाजप आमदाराची मागणी

Last Updated:

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला, असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : भारतीय प्रशासन सेवेतील धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार कृष्णा खोपडे केली आहे. तुकाराम मुंढे हे कोरोना काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले. त्या काळात त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार केले आहेत, असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला. त्यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. या प्रकरणात त्यांची चौकशी करून त्यांना अटक करा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.
तुकाराम मुंढे-कृष्णा खोपडे
तुकाराम मुंढे-कृष्णा खोपडे
advertisement

तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला. याविरोधात लक्षवेधीतून बाजू मांडणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले

तुकाराम मुंढे हे केवळ मीडिया आणि एनजीओप्रेमी आहेत. आम्ही सभागृहात मागणी करणार आहोत की तुकाराम मुंढे यांना तातडीने निलंबित करून अटक करावी, असे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

advertisement

तुकाराम मुंढे कोविडच्या काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले. सात महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गैरप्रकार केले. तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटीचे अधिकार दिले नव्हते. तरीही त्यांनी अधिकार क्षेत्रात घुसखोरी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पात महिला अधिकारी होत्या. तुकाराम मुंडे यांनी त्या महिला अधिकाऱ्यांचा छळ केला. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, असे कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, कांद्याला आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नाही. माहितीच्या अधिकारात आम्ही सर्व माहिती मागितली आहे. त्यांना अधिकार नसतानाही पाच वर्षे त्या पदावर दाखविण्यात आले. आम्ही मुंढे यांच्याविरोधात लक्षवेधी दाखल केलेली आहे. मुंढे यांनी कोरोना काळात नागपूरचा कसा सत्यानाश केला, हे मांडणार आहे, असे खोपडे म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS तुकाराम मुंढे यांना निलंबित करा, त्यांना अटक झाली पाहिजे, भाजप आमदाराची मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल