मक्याच्या दरात वाढ
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्याच्या कृषीमार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 48 हजार 248 क्विंटल इतकी झाली. यापैकी अमरावती मार्केटमध्ये 12 हजार 400 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1450 ते जास्तीत जास्त 1777 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 743 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. रविवारच्या तुलनेत मक्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
कांद्याला किती मिळाला दर?
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 37 हजार 111 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. नाशिक बाजारात 44 हजार 602 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 300 ते 1724 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 5400 क्विंटल पोळ कांद्यास प्रतीनुसार 500 ते 4411 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झालेली दिसून येते आहे.
सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे?
राज्याच्या मार्केटमध्ये 61 हजार 884 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 23 हजार 129 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3901 ते 4589 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3600 क्विंटल सोयाबीनला 5450 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनच्या दरातही वाढ बघायला मिळत आहे.





