या उपक्रमाचे लोकार्पण खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होत्या. महापालिकेने तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू केलेला हा उपक्रम नागरिकांसाठी वेळ आणि श्रम वाचवणारा ठरेल.
व्हॉट्सॲपवर मिळणार 'वन क्लिक' सेवा
या नव्या सुविधेमुळे आता नागरिकांना एका क्लिकवर अनेक सेवांचा लाभ घेता येईल. यामध्ये महापालिका प्रशासन, पाणीपट्टी, मालमत्ता कर भरणे, तक्रार निवारण आणि इतर अनेक महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या चॅटबॉटद्वारे मुख्यमंत्री मदत केंद्र आणि आपत्कालीन सेवांशीही संपर्क साधणे सोपे झाले आहे.
advertisement
ही सेवा वापरण्यासाठी नागरिकांना महापालिकेचा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक 7030036363 आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर या क्रमांकावर 'Hi' किंवा 'कळ' असा मेसेज पाठवल्यावर लगेचच ओटीपी (OTP) येईल. ओटीपी टाकल्यानंतर नागरिकांना हवा असलेला विभाग निवडून आपली तक्रार किंवा सेवा नोंदवता येईल.
हे ही वाचा : महाप्रसादच्या प्लेटवरून पेटला वाद, राग मनात 2 दिवसांनी घेतला बदला, सांगलीत गणेशोत्सवात घडला थरार!
हे ही वाचा : मूल होण्याचं दाखवलं आमिष; घरात घुसला भोंदूबाबा अन् 'त्या' पती-पत्नीला ₹40000 लावला चुना!