मूल होण्याचं दाखवलं आमिष; घरात घुसला भोंदूबाबा अन् 'त्या' पती-पत्नीला ₹40000 लावला चुना!

Last Updated:

Sangali News : एका गावातील दाम्पत्याला एका अनोळखी व्यक्तीने मूल होण्यासाठी औषध देण्याचे आश्वासन दिले. त्यापूर्वी काही धार्मिक विधी करावे लागतील, असे...

Sangali News
Sangali News
Sangali News : मिरज तालुक्यातील एका गावात एका दाम्पत्याला मूल होण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल 40 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या दाम्पत्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घरात घुसून असा मारला डल्ला
घटनेची माहिती अशी की, एका गावातील दाम्पत्याला एका अनोळखी व्यक्तीने मूल होण्यासाठी औषध देण्याचे आश्वासन दिले. त्यापूर्वी काही धार्मिक विधी करावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानुसार, तो भामटा त्या दाम्पत्याच्या घरी आला आणि त्याने पती-पत्नीला घरातील देवघरासमोर बसवले.
यावेळी त्याने त्यांना अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून एका ब्लाऊज पीसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर, त्याने ते दागिने एका पितळी हंड्यात ठेवल्याचा बहाणा केला. त्याने दाम्पत्याला सांगितले की, 'मी मंदिरात जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही 20 मिनिटे जागेवरून हलू नका.'
advertisement
...अन् दागिने घेऊन फरार
त्यानंतर तो भामटा तिथून पळून गेला. बराच वेळ वाट पाहूनही तो परत आला नाही, तेव्हा दाम्पत्याने हंड्यात पाहिले. पण त्यांना त्यात दागिने सापडले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
मूल होण्याचं दाखवलं आमिष; घरात घुसला भोंदूबाबा अन् 'त्या' पती-पत्नीला ₹40000 लावला चुना!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement