TRENDING:

Mumbai Dabbawala: मॅनेजमेंट गुरूंना मिळालं हक्काचं ठिकाण, वांद्र्यात उभं राहिलं डबेवाला भवन

Last Updated:

Mumbai Dabbawala: 133 वर्षांपूर्वी एका डब्यापासून सुरू झालेल्या या सेवेला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. म्हणून या सेवेचा पाया रचणाऱ्या संस्थापक महादेव बच्चे यांना नवीन भवनात विशेष स्थान देण्यात आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मॅनेजमेंट गुरू म्हटलं की सर्वप्रथम आठवतात ते मुंबईचे डबेवाले. घड्याळाच्या काट्यावर आणि सायकलच्या चाकावर फिरणारे हे मुंबईचे 'जेवणदूत' गेल्या 133 वर्षांपासून अनेकांचे डबे वेळेवर पोहोचवत आहेत. 14 ऑगस्ट 2025 रोजी (गुरुवार) या डबेवाल्यांच्या अद्वितीय सेवेला आंतरराष्ट्रीय मान्यता देणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय मुंबई डबेवाला भवना'चं उद्घाटन झालं. वांद्रा (खार रोड) येथील हार्मोनी अपार्टमेंटमध्ये हे मुंबई डबेवाला भवन सुरू झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि समस्त डबेवाला बांधवांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.
advertisement

विठ्ठलाची मूर्ती आणि वारकरी परंपरा

डबेवाला भवनात प्रवेश करताच डोळ्यांना एक आगळावेगळा देखावा दिसतो. प्रवेशद्वारासमोरच डब्यामध्ये कोरलेली विठ्ठलाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. मुंबईचे डबेवाले आणि वारकरी संप्रदायाचं नातं जुनं आणि घट्ट आहे. 'रामकृष्ण हरी'च्या गजरात दिवसाची सुरुवात करणाऱ्या या बांधवांसाठी ही मूर्ती त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. भवनात महादेव हावजी बच्चे यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे. 133 वर्षांपूर्वी एका डब्यापासून सुरू झालेल्या या सेवेला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. म्हणून या सेवेचा पाया रचणाऱ्या संस्थापक महादेव बच्चे यांना नवीन भवनात विशेष स्थान देण्यात आलं आहे.

advertisement

सायकल, हातगाड्या आणि डब्यांचा प्रवास

View More

डबेवाले म्हणजे सायकलचा वापर आणि वेळेचे काटेकोर नियोजनाचं उत्तम उदाहरण आहेत. डबेवाला भवनात कोड क्रमांक असलेल्या सायकलींवर लटकवलेले डबे ठेवलेले दिसतात. त्याचबरोबर हातगाडीसह डबेवाल्यांची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे. जुन्या काळापासून आजपर्यंत डब्यांच्या डिझाइनमध्ये कसे बदल झाले, याची झलकही येथे वेगवेगळ्या प्रकारच्या डब्यांच्या प्रतिकृतींद्वारे पाहायला मिळते. पांढरा सदरा, पांढरे धोतर, गांधी टोपी हा डबेवाल्यांचा पारंपरिक पोशाख देखील भवनात ठेवण्यात आला आहे. हा पोशाख त्यांची ओळख आणि सन्मान दोन्ही जपतो.

advertisement

इतिहास जपणारे क्षणचित्र दालन

डबेवाल्यांच्या गौरवशाली क्षणांसाठी भवनात एक खास दालन तयार करण्यात आलं आहे. दिल्लीतील राजपथावर दाखवलेला डबेवाल्यांचा चित्ररथ, इंग्लंडचे राजे चार्ल्स यांनी घेतलेली भेट, डबेवाल्यांच्या मॅनेजमेंट कौशल्याची दखल घेतलेले प्रसंग इत्यादी गोष्टी फोटो स्वरूपात जतन केल्या आहेत. डबेवाल्यांना मिळालेली सर्व बक्षिसे, गौरवपत्रे आणि सन्मान देखील या दालणात मांडले आहेत.

advertisement

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीद्वारे डबेवाल्यांचा अनुभव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचा सतत कोरडी पडते? आहारात समावेश करा हे तूप, दिसेल तजेलदार
सर्व पहा

व्हीआर (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) रूम हा भवनातील सर्वात आकर्षक भाग आहे. व्हीआर गॉगल्सच्या सहाय्याने पर्यटकांना डबेवाल्यांचा संपूर्ण दिवस केवळ चार मिनिटांत अनुभवता येतो. पहाटे उठण्यापासून, ट्रेन पकडण्यापर्यंत, डबे वेळेत पोहोचवण्याच्या धावपळीपासून ते संध्याकाळी उरलेल्या वेळेचा उपयोग कसा केला जातो, याची सफर येथे घडवली जाते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Dabbawala: मॅनेजमेंट गुरूंना मिळालं हक्काचं ठिकाण, वांद्र्यात उभं राहिलं डबेवाला भवन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल