डेंग्यूमध्ये कमी झालेल्या प्लेटलेट्स 3 दिवसांत वाढतील, 'हा' उपाय आहे रामबाण!
सोलापूर जिल्ह्यातील धवळस ते भाळवणी या रेल्वे मार्गावर अधिकाऱ्यांनी नुकतीच स्वयंचलित प्रणालीची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वीपणे पार पडली असून रेल्वे बोर्डाने मंजूरी दिली आहे. ‘कवच’ स्वयंचलित सुरक्षा प्रणालीमध्ये अनेक गोष्टींची चाचणी घेण्यात आली. यामध्ये, थांब्यावर लोकल रेल्वे धोकादायकपणे सिग्नल ओलांडण्याबाबत (सिग्नल पास ॲट डेंजर), अचानक थांबा निर्माण करणे (ब्लॉक सेक्शन एसओएस), स्थानक प्रमुखाद्वारे थांबा निर्माण करणे (स्टेशन मास्टर एसओएस) आणि रुळ बदलताना रेल्वेची गती सुनिश्चित करणे (टर्नआउट्स ओव्हरस्पीड) या प्रकारच्या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या.
advertisement
टॉय ट्रेननंतर आता मिळणार 'जॉय ट्रेन'ची मजा, कोणत्या पर्यटन स्थळी मिळणार सुविधा?
त्यामुळे भारतीय रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये आणखीनच वाढ होईल. इंजिन चालक अधिकच सुरक्षितपणे ट्रेन चालवू शकेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय रेल्वेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भविष्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानातील बदल पाहता त्या पद्धतीनेच भारतीय रेल्वेने हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रेल्वेच्या स्वयंचलित सुरक्षा प्रणालीविषयी सांगितले की, "भविष्यातील तंत्रज्ञानामधील बदल पाहता त्यासाठीची संपूर्ण परिसंस्था तयार करून प्रवाशांसाठीच्या सुरक्षा नियमांचे काटेकोर प्रशिक्षण आणि अंमलबजावणी करणे निश्चित केले आहेत. रेल्वेची कार्यक्षमता वाढवून प्रवाशांसाठीची सुरक्षा अधिकच सक्षम करायची आहे. शिवाय प्रवाशांना उत्तम सेवा देखील प्रदान केली जाणार आहे."
महाराष्ट्रातील ‘या’ गावात पहिल्यांदाच आली वीज, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी
'कवच' प्रणाली म्हणजे काय?
देशी बनावटीची असलेली ही स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली ही रेल्वे आणि प्रवासी यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. युनिटच्या माध्यमातून रेडिओ तरंग लहरीद्वारे धोक्याची पूर्वसूचना निश्चित करून ही प्रणाली माहिती देण्याचे काम करेल. तंतोतंत आणि अचूक माहितीची ही प्रणाली देण्याचे काम करेल. धावत्या रेल्वेला जर पुढे धोका निर्माण झाला असेल, तर त्याचे पूर्वानुमान लावून स्वयंप्रकारे वेगमर्यादा अंमलात आणून शकेल. त्यामुळे रेल्वे परिचालन सुरक्षित- कार्यक्षम होईल.
'कवच' प्रणालीचा फायदा काय?
जर कोणत्याही रूळामध्ये बिघाड असेल किंवा रूळ बदलत असताना काही अपघात परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याची ड्रायव्हरला पुर्वकल्पना मिळेल. प्रवासादरम्यान जर कुठेही कोणती जोखीम असेल तर त्याची पुर्वकल्पना मिळेल. शिवाय, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपोआप ब्रेक लागेल. रुळ ओलांडताना वेग मर्यादेवर संतुलन त्यामुळे प्रवासाची गती वाढणार आहे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि जलद प्रवास होईल.