Thane Electricity: महाराष्ट्रातील ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आली वीज, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी
- Published by:Chetan Bodke
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Thane village Electricity: महाराष्ट्रातील काही गावांत स्वातंत्र्यानंतर 78 वर्षे झाली तरीही वीज पोहोचलेली नाही. नुकतेच ठाण्यातील एका गावात पहिल्यांदाच वीज आल्याने दिवाळी साजरी झाली.
ठाणे : महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अजूनही रस्ते, पाणी, आरोग्य आणि वीज अशा मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यातील वारसवाडी या आदिवासी पाड्यालाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागत होते. पण आता तब्बल 78 वर्षांनंतर या पाड्यात वीज आली असून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे अंधारात जीवन जगल्यानंतर गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच घराघरात दिवे लागले. महावितरणने गावात 63 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला असून त्यामुळे प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. याआधी ग्रामस्थांना केवळ कंदील आणि चुलीच्या प्रकाशावरच काम भागवावे लागत होते. आता मात्र घरकाम, मुलांचे अभ्यास आणि रात्रीचा प्रवास या सगळ्यांसाठी मोठी सोय झाली आहे.
advertisement
आदिवासी भागात असलेल्या वारसवाडी गावात 60 जण राहतात. गावातील रस्त्यांवरही पहिल्यांदा दिवे लागल्याने सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गावात वीज आल्याचा आनंद ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. फटाके फोडले, एकमेकांना मिठ्या मारल्या आणि हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Electricity: महाराष्ट्रातील ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आली वीज, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी