TRENDING:

भारतीय पोस्ट बँकेत भरती, ग्रॅज्युएट तरूणांना संधी; अर्जाची लिंक बातमीमध्ये

Last Updated:

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पदवीधर उमेदवारांसाठी रिक्त पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. पोस्टात निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती वेगवेगळ्या राज्यात केली जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनेकांचे सरकारी कार्यालयांमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पोस्टामध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. अलीकडेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पदवीधर उमेदवारांसाठी रिक्त पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. पोस्टात निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती वेगवेगळ्या राज्यात केली जाईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

ग्रॅज्युएट असणारे तरूण सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी 9 ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 29 ऑक्टोबरपर्यंत आयपीपीबीच्या अधिकृत वेबसाइटला ippbonline.com भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी व्यवस्थित जाहिरातीची PDF एकदा वाचावी. PDF ची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्याचीही लिंक बातमीमध्ये देण्यात आली.

advertisement

एक्झिक्युटिव्ह पदासाठी संपूर्ण देशामध्ये 348 जागांसाठी ही नोकरभरती केली जात आहे. उमेदवार या पदासाठी अंतिम तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. ही भरती इंडिया पोस्ट विभागामार्फत जात आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय 20 ते 35 वर्ष दरम्यान असावे. वयाची गणना 1 ऑगस्ट 2025 पासून केली जाईल. जातनिहाय वयामध्ये सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या वयाची व्यवस्थित गणना करूनच अर्ज भरावा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारे अर्जदारांची निवड केली जाईल. जारी केलेल्या अधिसूचनेसाठी आवश्यक असल्यास, CBT परीक्षा घेतली जाऊ शकते. आयपीपीबी जीडीएस एक्झिक्युटिव्ह पदासाठीचा मासिक पगार 30,000 रुपये इतका आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती वेगवेगळ्या राज्यात केली जाईल. अधिक माहितीसाठी, आपण जारी केलेली भरती अधिसूचना तपासू शकता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भारतीय पोस्ट बँकेत भरती, ग्रॅज्युएट तरूणांना संधी; अर्जाची लिंक बातमीमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल