आरक्षण सोडत नगरपरिषदेच्या नाट्यगृहात येथे अनुसूचित जाती-जमाती नागरिकांच्या मागासवर्ग महिलांसाठी आणि सर्वसाधारणसाठी आरक्षण सोडत प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अंमळनेर नितीन मुंडावरे, सहाय्यक पीठासन अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर आरक्षणाची सोडत अनुभविण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
नगरपरिषदेच्या पंधरा प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. ३१ जागांपैकी १६ जागांवर महिलांचे आरक्षण निघाले. तर १५ जागांवर पुरुषांना संधी मिळणार आहे. महिलांचे आरक्षण याप्रमाणे सर्वसाधारण महिला दहा जागा, ओबीसी महिलांसाठी चार जागा, एसटी महिलेसाठी एक आणि एससी महिलांसाठी एक असे आरक्षण सोडत काढण्यात आली. ज्या नागरिकांना आरक्षण सोडत संदर्भात हरकत घ्यायची असेल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकत घेऊ शकता, असे पीठासन अधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले.