गेल्या नऊ दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले कोल्हे यांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या बनावट कॉल सेंटरद्वारे अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह अन्य देशांतील नागरिकांना कॉल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात होती.
२८ सप्टेंबर रोजी जळगाव पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून ३१ लॅपटॉप जप्त केले. तपासात समोर आले की केवळ दोन दिवसांत ६७ विदेशी नागरिकांना कॉल झाले होते, तर १२ दिवसांत हे प्रमाण ६५० पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोज कॉल डेटा डिलिट करण्याचे आदेश होते.
advertisement
या प्रकरणात ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद हे तीन प्रमुख सूत्रधार अद्याप फरार असून, ते विदेशात पलायन करू नयेत म्हणून लूकआउट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन मंत्र्यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोपही झाला असून, एका मंत्र्याने कोल्हेंना व्हीआयपी ट्रीटमेंट, तर दुसऱ्याने कठोर कारवाईसाठी पोलिसांना फोन केल्याचे बोलले जात आहे. यामुळे तपासावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेतही मिळाले आहेत.
या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे
-माजी महापौर ललित कोल्हे व १० जणांविरुद्ध करण्यात आला होता गुन्हा दाखल, ८ जण अटकेत, तीन मुख्य सूत्रधार आहेत फरार
-ललित कोल्हेला ९ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली
-बनावट कॉल सेंटरवरून अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह अन्य देशांतील नागरिकांची फसवणूक
-३१ लॅपटॉपमधून ६५० पेक्षा अधिक परदेशी नागरिकांना कॉल झाल्याची शक्यता
-तीन प्रमुख आरोपी फरार; लूकआउट नोटीस जारी, तपास केंद्रीय यंत्रणांकडे जाण्याची शक्यता
-ललित कोल्हेला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी एका मंत्र्याचा तर दुसऱ्या मंत्र्यांकडून कडक कारवाईसाठी पोलिसांना फोन केल्याचा आरोप
-आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली