मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ वरून मुंबईच्या दिशेने ही पुष्पक एक्सप्रेस निघाली होती. त्यानंतर भूसावळहून 6 किलोमीटर पुढे जळगावच्या दिशेने ही एक्सप्रेस जाताना एका बोगीखाली प्रचंड धुर बाहेर येत होता. हा धूर अख्ख्या ट्रेनमध्ये पसरता होता.त्यामुळे हा धुर पाहून लोकोपायलटला ट्रेनमध्ये काहीतरी गडबड असल्याचे कळाले त्यामुळे त्याने तत्काळ मोटोरनमन आणि गार्डला याची माहिती दिते ट्रेने थांबवण्यास सांगितले होते.
advertisement
त्यानंतर ज्या ठिकाणावरून धुर येत होता त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक्सप्रेसच्या एस 4 च्या बोगीखाली अचानक आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर तत्काळ रेल्वेच्या अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
ट्रेनच्या बोगी खाली लागलेल्या या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे.पण या घटनेने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे अद्याप कारणे समजू शकली नाही आहेत.रेल्वेचे अधिकारी या मागचा शोध घेत आहे.