Vegetables Rate Pune: अतिवृष्टीचा फटका, पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ, पुण्यात काय आहेत भाव?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
राज्यात मागील 15 दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे.
पुणे: राज्यात मागील 15 दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे मार्केट यार्ड बाजारात पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे सर्वच भाज्यांचे आणि फळांचे भाव तेजीत आहेत. याबाबतची अधिक माहिती भाजीविक्रेते नारायण पालकृतवार यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
राज्यात मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्या आणि फळभाज्या खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी बाजारपेठेत पालेभाज्यांची आणि फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे आणि फळांचे भाव तेजीत आहेत. शिमला मिरची, गवार, भेंडी, कोबी, मेथी या पालेभाज्यांच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
advertisement
काय आहेत पालेभाज्यांचे दर
सततच्या पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालक, मेथी, कोथिंबीरची मार्केट यार्डमध्ये आवक कमालीची घटली आहे. पालक जुडी 40 ते 50, मेथी एक जुडी 30 ते 40, कोथिंबीर एक जुडी 30 ते 50 पर्यंत पोहोचली आहे.
advertisement
फळांच्या दरात तेजी
सध्या पुणे मार्केट यार्डात फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सफरचंद, केळी, संत्रा आणि डाळिंब या फळांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सफरचंद 300 रुपये किलो, संत्रा 200 रुपये किलो तर डाळिंब 200 रुपये किलोने विकले जात आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 01, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vegetables Rate Pune: अतिवृष्टीचा फटका, पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ, पुण्यात काय आहेत भाव?