नेमकं काय घडलं?
भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबला होता. याच वेळी अचानक तरुणांचं एक टोळकं तिथे आले. त्यांनी या दोघांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. काही वेळातच या टोळक्याने दोघांच्या संबंधांवरून 'लव्ह जिहाद'चा संशय व्यक्त केला आणि थेट तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने त्या तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, संतप्त टोळक्याने त्या तरुणाची दुचाकीही पेटवून दिली.
advertisement
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून तातडीने कारवाई
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणावर हल्ला करणाऱ्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत या घटनेतील तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या टोळक्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले की, "सध्या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल."